Slum Area in Mormugao: राज्यात सूचित केलेल्या सर्व झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन केले जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभा अधिवेशनात अर्थसंकल्प मांडताना सांगितले होते.
परंतु त्यांच्या या विधानाने कोमुनिदादींसमोर अनेक प्रश्र्न उभे झाले आहेत. खास करून मडगावातील मोतीडोंगर येथील झोपडपट्टीबद्दल मडगाव व आके कोमुनिदाद, दक्षिण गोवा कोमुनिदाद फोरमने प्रश्र्न उपस्थित केले आहेत.
आके, मडगाव कोमुनिदादींचा लढा
आके कोमुनिदादचे ॲटर्नी सेलेस्टियन नोरोन्हा यांनी सांगितले की, मोतीडोगर येथे झोपडपट्टी असलेली जागा कोमुनिदादची आहे. जेव्हा कोमुनिदादने झोपडपट्टी पाडण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हा ॲटर्नीने स्पष्ट केले होते की ही झोपडपट्टी सूचित केलेली नाही.
अशा परिस्थितीत मोतीडोंगर झोपडपट्टीचे पुनर्वसन सरकार कोणत्या आधारावर करेल? या झोपडपट्टीचे प्रकरण उच्च न्यायालयात आहे व त्याच्या निकालाची आम्ही वाट पाहत आहोत. हे प्रकरण न्यायालयात असताना सरकारला पुनर्वसन करता येईल का? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.
आके, मडगाव कोमुनिदादींचा लढा
प्रत्येक सरकारने आपल्या स्वार्थासाठी कोमुनिदाद जमिनींचा वापर केला. झोपडपट्टीत राहणाऱ्यांचे पुनर्वसन केले तर ते कुठे केले जाईल, हासुद्धा प्रश्र्न उपस्थित होतोच असे दक्षिण गोवा कोमुनिदाद फोरमचे सचिव सावियो कुरैय्या यांनी सांगितले.
मोतीडोंगरावर जी बेकायदा बांधकामे झालेली आहेत, ती आके कोमुनिदाद जमिनीवर व ताळसाझोर येथे मडगाव कोमुनिदादच्या जमिनीत आहेत. गेल्या ३० वर्षांपासून दोन्ही कोमुनिदादी या जागा परत ताब्यात मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत, असेही कुरैय्या म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.