उपजिल्हाधिकारी ज्योती कुमारी. Dainik Gomantak
गोवा

Goa: शाळा सुरु झाल्यावर विद्यार्थ्यांसह शिक्षक, शाळा प्रशासनासमोर आव्हान 

(Goa) आझादीका अमृत महोत्सव कार्यक्रमा अंतर्गत शिक्षकांचा सत्कार, चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आले

Mangesh Borkar

फातोर्डा: गेल्या वर्षी व यंदा कोविड (Covid) महामारीमुळे विद्यार्थ्यांना (student) घरी बसुनच शिक्षण घ्यावे लागत आहे. शिक्षकांना (Teacher) रिकाम्या वर्गात शिकवावे लागते व शाळा (school) व्यवस्थापनांना सर्व नियम (Rules) पाळुन कामकाज पहावे लागते. 

सद्या राज्यात कोविड रुग्णांची संख्या कमी होत आहे. परिस्थिती आटोक्यात आहे. तरी  पुर्ण धोका टळलेला नाही.  सरकारने अजून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतलेला नाही. परंतु एकदा शाळा सुरु झाल्या की मग विद्यार्थ्यांसह शिक्षक, व शाळा प्रशासनांसमोर मोठे आव्हान असणार आहे. असे दक्षिण गोव्याच्या उपजिल्हाधिकारी ज्योती कुमारी यानी सांगितले.केंद्राच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाने आयोजित आझादीकी अमृत महोत्सवा अंतर्गत आयोजित प्रदर्शनात दुसऱ्या दिवशी आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणुन त्या बोलत होत्या. या प्रसंगी मडगाव परिसरातील शाळा प्रमुखांचा सत्कार करण्यात आला व मंत्रालयाने घेतलेल्या ऑनलाईन शालेय चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. मंत्रालयाने रविंद्र भवन मडगाव परिसरात आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमातही भाग घेतला.

रविन्द्र केळेकर ज्ञानमंदिराचे मुख्याध्यापक अनंत अग्नीचा सत्कार करताना उपजिल्हाधिकारी व मंत्रालयाचे रियास बाबू टी.

भारताच्या स्वातंत्र्यापुर्वीचे व आता आम्ही जगतात त्या जिवनामध्ये फार मोठा फरक आहे. आम्ही देशाच्या सार्वभौमत्व, एकात्मता व समानतेसाठी कार्यरत राहणे महत्वाचे असल्याचे त्यानी सांगितले. ज्या शाळा प्रमुखांचा सत्कार करण्यात आला त्यात रविन्द्र केळेकर ज्ञानमंदिराचे अनंत अग्नी, भाटीकार मॉडेलच्या सरिता मळकर्णेकर, सरकारी विद्यालय दवर्लीच्या रेश्मा चणेकर, फातिमा कॉनवेंटच्या मारिया नामिका ए सी, व दामोदर विद्यालयाच्या संध्या साळगावकर, टी बी कुन्हाच्या स्नेहल एस राणे व सेंट जॉसेफ कॉनवेंट आकेच्या मारिया ई पिरीस यांचा समावेश आहे.

चित्रकला स्पर्धेतील विजेते - दिवराज पवार, मरदादीन मुल्ला, रिल्सी व्हाईट, विनिता चव्हाण, श्रेया गिड्डी, वेदांत विष्णु बोरकर, काव्या सुरज नाईक पवार, अश्मी राजेश नाईक, एथन टी नियासो, पुर्वा नेरुरकर.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: सरकारी नोकरी घोटाळ्यात भाजपचे नेते गुंतलेत; अमित पालेकरांचा हल्लाबोल!

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

Mormugao Fort: ऐतिहासिक 'मुरगाव किल्ल्याचे' होणार पुनर्निर्माण! मुख्यमंत्री सावंतांनी गुणवत्तापूर्ण कामाचा दिला विश्वास

Cuncolim IDC: कुंकळ्ळी औद्योगिकमध्ये ओंगळवाणी परिस्‍थिती! कर्मचारी राहतात तेथेच करतात आंघोळ; निरीक्षकांनी केली पाहणी

Goa Post Office: गोव्यात पोस्टाची सेवा ठप्प! देशभरातील इंटरनेट सेवेत बिघाड; बॅंकिंग सेवेला मोठा फटका

SCROLL FOR NEXT