CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

Goa Cabinet Expansion : गोवा राज्य मंत्रिमंडळात लवकरच खांदेपालट

मुख्यमंत्र्यांची कसोटी : बंडखोर आमदार गटाकडून तीन मंत्रिपदांची मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Cabinet Expansion : भाजपने काँग्रेसच्या आठ आमदारांना पक्षप्रवेश देऊन आपल्या आमदारांची संख्या 28 वर नेली असली तरी काँग्रेसमधून आलेल्या या आठ जणांना योग्य ते बक्षीस द्यावेच लागणार आहे. यासाठी मंत्रिमंडळात लवकरच बदल केले जाणार असून या बंडखोरांची तीन मंत्रिपदांची मागणी आहे.

मात्र, मंत्रिमंडळाच्या मर्यादेनुसार विद्यमान मंत्रिमंडळातील तितक्याच मंत्र्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना यासाठी कसरत करावी लागणार असून त्यांची कसोटी लागणार आहे हे मात्र निश्चित.

विद्यमान बंडखोरांपैकी माजी मंत्री मायकल लोबो, आलेक्स सिक्वेरा आणि अन्य एकाला मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे. यासाठी मंत्रिमंडळातून तीन मंत्र्यांना कमी करावे लागणार आहे. यात सहकारमंत्री सुभाष शिरोडकर, पर्यटन मंत्री रोहन खंवटे, मच्छीमार मंत्री नीळकंठ हर्ळणकर किंवा कृषिमंत्री रवी नाईक यांचा नंबर लागू शकतो. यापैकी रवी नाईक हे भंडारी समाजाचे नेते असले तरी त्यांची प्रकृती नाजूक बनली आहे. रोहन खंवटे यांच्या विरोधात काँग्रेसच्या गिरीश चोडणकरांनी मोहीम उघडली आहे. त्यामुळे कोणत्या मंत्र्यांना वगळण्यात येईल, यावर राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

राज्यसभा आणि लोकसभा निवडणुकांचा विचार

विधानसभा निवडणुका होऊन वर्षही झालेले नाही. या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसचे घाऊक आमदार फोडून भाजपमध्ये सामावून घेण्याच्या पाठीमागे भाजपची मोठी रणनीती आहे. कोणत्याही परिस्थितीत येणारी राज्यसभा आणि लोकसभेच्या दोन्ही जागा भाजपला आपल्या पदरात पाडायच्या आहेत. भाजपसाठी उत्तर गोव्याची जागा जिंकणे सोपे असले, तर दक्षिण गोव्याची जागा जरा कठीण आहे. यासाठीच भाजपने दिगंबर कामत, आलेक्स सिक्वेरा आणि चार कॅथलिक आमदारांना पक्ष प्रवेश दिला आहे.

समीकरणे महत्त्वाची

मंत्रिमंडळात बदल किंवा विस्तार करताना अनेक बाबींचा विचार करावा लागणार आहे. यामध्ये सामाजिक स्तर, आर्थिक गणिते आणि राजकीय भवितव्य,जातीचे राजकारण या बाबींना प्राधान्य असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

Goa crime: एडिसन सोरंग खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप; किरकोळ वादाचे हत्येत रुपांतर, फावड्याने वार करून मित्राला संपविले

SCROLL FOR NEXT