Agonda News Dainik Gomantak
गोवा

Agonda News : सभापतींकडून नगर्से बालभवनची पाहणी; दुरुस्तीच्या मागणीची घेतली तत्परतेने दखल

संबंधितांना दिल्या सूचना : दुरुस्तीच्या मागणीची घेतली तत्परतेने दखल

गोमन्तक डिजिटल टीम

Agonda : नगर्से-काणकोण येथील बालभवनची दुरुस्ती करण्याची मागणीची दखल घेऊन सोमवार, १७ रोजी सभापती आणि काणकोण मतदारसंघाचे आमदार रमेश तवडकर यांनी स्वतः जाऊन निरीक्षण केले. इमारत दुरुस्तीसंबंधी संबंधितांना आवश्यक सूचना दिल्या. यासंबंधीचे वृत्त ‘दैनिक गोमन्तक’ने सचित्र प्रसिद्ध केले होते.

यावेळी बालभवनचे संचालक दयानंद चावडीकर, लेखा प्रमुख लक्ष्मीकांत मणेरकर, काणकोण बालभवन केंद्राचे प्रमुख विठोबा वेळीप, स्थानिक नगरसेवक हेमंत नाईक गावकर आदी उपस्थित होते.

यावेळी संचालक म्हणाले की, काणकोण ‘बालभवन’विषयी वर्तमानपत्रात वाचले अन् त्यासंदर्भात केंद्र प्रमुखाने कळविले होते. त्याविषयी पाहणी करण्यासाठी आले असता योगायोगाने सभापती रमेश तवडकर यांचीही इथे भेट झाली. सभापती तवडकर यांच्या सहकार्याने व पाठिंब्यामुळे हा विषय लवकरात लवकर सुटेल यात तीळमात्र शंका नाही.

काणकोण बालभवन केंद्राची ही इमारत तशी खूप जुनी असल्यामुळे आणि छप्पर कौलारू असल्यामुळे वादळवाऱ्यात व इतर कारणांमुळे छपराचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. बालभवनला व्यवस्थित नियोजित स्वरूप देण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे रितसर पाठपुरावा करणार आणि लवकरात लवकर सुसज्ज अशी नवे स्वरूप असलेली इमारत आपणा सर्वांना पाहायला मिळणार.

रमेश तवडकर, सभापती

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cristiano Ronaldo: रोनाल्डो 'गोव्यात' खेळणार की नाही? सुरक्षा यंत्रणा घेणार निर्णय; देशभरातील फुटबॉलप्रेमी आशावादी

Goa AAP: 'गोव्यात काँग्रेसने जनतेचा विश्‍वास गमावला'! आतिषी यांचे प्रतिपादन; आघाडी करणार नसल्याचा पुनरुच्चार

Goa Politics: खरी कुजबुज; फोंड्यात अशीही बनवाबनवी

Goa Cabinet: चतुर्थीपूर्वी मंत्रिमंडळात होऊ शकतो बदल; दामू नाईकांचा संकेत; मुख्‍यमंत्र्यांकडून ‘सस्‍पेन्‍स’ कायम

Coconut Price Goa: 45 रुपयांचा नारळ स्वस्त कसा? विजय सरदेसाईंचा सवाल

SCROLL FOR NEXT