Central fund for Goa development Dainik Gomantak
गोवा

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Development Projects: राज्य आणि केंद्र सरकार गोव्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

सासष्टी: राज्य आणि केंद्र सरकार गोव्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. केंद्र सरकारने अलीकडेच राज्‍यात सुमारे दोन हजार कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी दिली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत यांनी दिली.

मडगाव येथे आयोजित क्रांतीदिन कार्यक्रमात कामत बोलत होते. सकाळी सरकारी पातळीवर तर संध्याकाळी १८ जून क्रांतिदिन समितीतर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रम, देशभक्तिपर सादरीकरणे आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी ‘माझे घर’ योजना, नगरपालिका कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण तसेच गुरुनाथ केळेकर मार्गाच्या कामांचा कामत यांनी विशेष उल्लेख केला. प्रारंभी मंत्री दिगंबर कामत आणि उपस्थित मान्यवरांनी हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. पोलिसांकडून मानवंदना देण्यात आली.

सेंट जोसेफ हायस्कूल (आके), पॉप्युलर हायस्कूल (मडगाव) आणि रवींद्र केळेकर ज्ञानमंदिर (विद्यानगर) येथील विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीतांचे सादरीकरण केले. १८ जून क्रांतीदिन समितीचे अध्यक्ष अविनाश शिरोडकर यांनी स्वागत केले.

डॉ.लोहिया यांच्या लढ्याची आठवण

१८ जून १९४६ रोजी डॉ. राम मनोहर लोहिया यांनी मडगाव येथे पोर्तुगीज राजवटीविरुद्ध आवाज उठवत गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्याला नवे वळण दिले. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी १८ जून रोजी ‘क्रांतिदिन’ साजरा केला जातो. गोमंतकीयांच्या स्वातंत्र्यलढ्यातील हा दिवस प्रेरणादायी मानला जातो.

केंद्राने मंजुरी दिलेले प्रकल्‍प

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या विकास प्रकल्पांमध्ये वेर्णा रस्त्याचे रुंदीकरण, उड्डाणपूल आणि अन्य पायाभूत सुविधा प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे वाहतूक व्यवस्था सुधारण्याबरोबरच औद्योगिक व आर्थिक विकासालाही चालना मिळणार असल्याचे मंत्री दिगंबर कामत यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT