गोवा

Mahadayi Water Dispute: केंद्र सरकारने कर्नाटकचा डीपीआर मंजूर करणे हा गोवेकरांचा विश्वासघात- लुईझिन फालेरो

केंद्रीय जल बोर्डाने कर्नाटकचा डीपीआर मंजूर करणे हा राज्यसभेचा हक्कभंग म्हणावा लागेल

गोमन्तक डिजिटल टीम

20 ऑगस्ट 2023 पर्यंत केंद्र सरकारं म्हादई बाबत कुठलाही निर्णय घेणार नाही असे स्पष्ट आश्वासन सरकारने राज्यसभेत दिलेले असताना कर्नाटक राज्याच्या डीपीआर मंजूर करण्याची कृती म्हणजे भारत सरकारने गोव्यातील जनतेचा विश्वासघात अशी टीका तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार लुईझीन फालेरो यांनी केली आहे.

मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या अधिवेशनात मी राज्यसभेत हा प्रश्र्न उपस्थित केला होता आणि त्यावेळी केंद्रीय वन व पर्यावरण मंत्र्यांकडून मला ऑगस्ट पर्यंत कुठलाही निर्णय घेतला जाणार नाही असे स्पष्ट आश्वासन दिले होते, असे असताना केंद्रीय जल बोर्डाने कर्नाटकचा डीपीआर मंजूर करणे हा राज्यसभेचा हक्कभंग म्हणावा लागेल असे ते म्हणाले.

काल फालेरो यांनी म्हादई खोऱ्याला भेट दिली. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी एक व्हिडिओ संदेश जारी केला असून म्हादई नदीवर गोव्यातील 60 टक्के अधिक लोकांचे जीवन अवलंबून आहे.

या खोऱ्यात ६ अभयारण्ये असून त्यातील मोले अभयारण्य हे जगातील आठव्या क्रमांकाचे जैव विविधता संवेदनशील क्षेत्र आहे. असे असतानाही केंद्र सरकार म्हादईचे पाणी वळविण्यास मंजुरी देऊन गोव्यातील पर्यावरण नष्ट करू पाहात आहे असा आरोप त्यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT