SADANAND SHET TANAVADE   Dainik Gomantak
गोवा

केंद्र सरकारने गोव्यात 'आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ' स्थापन करावे; राज्यसभेत खासदार तानावडेंची मागणी

खासदार सदानंद शेट तानावडे: राज्यात क्रीडा क्षेत्राच्या दृष्टीने पोषक वातावरण

Kavya Powar

Goa Sports University: गोव्यातील युवकांच्या भविष्याचा विचार करून गोव्यात 'आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ' स्थापन करावे, अशी विनंती राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केली आहे. केंद्रीय विद्यापीठ (दुरुस्ती) विधेयक 2023 च्या समर्थनार्थ राज्यसभेत भाषण करताना त्यांनी हा मुद्दा मांडला.

ते म्हणाले की, राज्यात क्रीडा क्षेत्राच्या दृष्टीने पोषक वातावरण आहे. त्यामुळे या दूरदर्शी उपक्रमामुळे गोव्यातील विविध क्रीडा शाखेतील तरुणांना त्यांच्या अफाट क्षमता आणि वैविध्यपूर्ण प्रतिभांचा उपयोग करणे शक्य होणार आहे.

गोव्यासारख्या राज्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ झाल्यास युवकांसाठी नवीन शैक्षणिक मार्गच खुले होणार नाहीत तर विद्यार्थ्यांसाठी उच्च कुशल करिअरचे मार्ग आणि उद्योजकीय संधींचे दरवाजेही उघडतील.

शैक्षणिक उपक्रमांच्या पलीकडे क्रीडा प्रशिक्षण, व्यवस्थापन आणि शारीरिक शिक्षणातील संशोधनाला चालना मिळेल. तसेच वाढत्या स्पोर्ट्स मीडिया क्षेत्रात मुलांना आपले पाय रोवण्यास मदत होईल, असे तानवडे यावेळी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: ''...तर आज इस्रायलचे अस्तित्वच नसते'' लेबनॉनमधील कारवाईवरुन ट्रम्प यांचे खळबळजनक वक्तव्य; नेतन्याहूंच्या युद्धनीतीवर सवाल

FIFA World Cup 2026: उरुग्वेकडून खेळतोय 'गोव्या'शी नातं असलेला खेळाडू; सौदी अरेबियाविरुद्ध केला निर्णायक गोल, कोण आहे Maximiliano Araujo?

Goa Village News: उसगाव-गांजेतील घरपट्टी शुल्कात होणार कपात; विशेष ग्रामसभेत ठराव संमत, गरिबांना होणार लाभ

Mayem Kayaking Service: मये तलावात 'कायाकिंग' बोटिंग सेवा सुरू

Emergency Health Services: आपत्कालीन आरोग्य सेवा होणार अधिक सक्षम; 24 तास नियंत्रण कक्ष उभारण्याचा प्रस्ताव, 108 सेवेचा सखोल आढावा

SCROLL FOR NEXT