Piyush Goyal Dainik Gomantak
गोवा

गोव्याला देशतील 'फार्मास्युटिकल हब' बनवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील; मंत्री पियूष गोयल यांची माहिती

केंद्र सरकार गोव्यासह किमान पाच राज्यांना देशातील फार्मास्युटिकल हब म्हणून विकसित करण्याचा विचार करत आहे.

दैनिक गोमन्तक

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल हे मागील 2 दिवस गोवा दौऱ्यावर होते. त्यावेळी ते म्हणाले की, केंद्र सरकार गोव्यासह किमान पाच राज्यांना देशातील फार्मास्युटिकल हब म्हणून विकसित करण्याचा विचार करत आहे.

दोना पावला हॉटेलमध्ये राज्यातील उद्योगपतींशी संवाद साधताना मंत्री गोयल म्हणाले की, केंद्र सरकार गोव्यातील पर्यटन क्षेत्रावरही भर देत आहे. राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी गोवा सरकार आणि केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचा एक कार्यगट तयार केला जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

राज्याच्या पर्यटनाचा विस्तार करताना, पर्यटकांसाठी होमस्टे ही चांगली संकल्पना आहे, जी इथे येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करू शकते. यामुळे स्थानिक खाद्यपदार्थ आणि परंपरांना देखील प्रोत्साहन मिळण्यास मदत होऊ शकते.

या भेटीदरम्यान, मंत्री पियूष गोयल यांनी राज्यातील औद्योगीक संस्था आणि भागधरकांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उद्योगमंत्री माविन गुदीन्हो आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडेही उपस्थित होते.

यावेळी पियूष गोयल यांनी गोव्याला देशातील फार्मा हब बनवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Literacy: अभिमानास्पद! गोवा साक्षरतेत देशात अव्वल; 99.27 टक्के नागरिक शिक्षित

Bits Pilani: ‘बिट्स पिलानी’बाबत धक्कादायक माहिती समोर! विद्यार्थ्यांना मिळायच्या सिगारेट्स; ‘कुरियर बॉय’ची तपासणी सुरु

Goa London Flight: लंडन-गोवा विमानसेवा रद्द! Air Indiaचा निर्णय; अहमदाबाद, अमृतसर सेवा होणार सुरु

Arpora: भटक्या गुरांची झुंज, दुचाकीला बसली जोरदार धडक; हणजूणच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

COD Fraud: ‘कॅश ऑन डिलिव्हरी’ करताय? लागू शकतो चुना; मुरगावात भामट्यांची टोळी सक्रिय, 12 जणांची फसवणूक

SCROLL FOR NEXT