Goa Eco Sensitive Zone Dainik Gomantak
गोवा

Goa Eco-Sensitive Area: जैवसंवेदनशील विभाग जाहीर करण्‍‍यास हालचाली सुरु; सप्टेंबरमध्ये अधिसूचना

Goa Eco Sensitive Zone: राज्य सरकारने जैवसंवेदनशील विभागातून ४० गावे वगळण्याची मागणी केली आहे

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: जैवसंवेदनशील विभागात येणारी गावे अधिसूचित करण्याच्या हालचाली केंद्रीय वन, पर्यावरण व हवामान बदल मंत्रालयाने सुरू केल्या आहेत. सध्या मसुदा अधिसूचनेत राज्यातील १०८ गावांचा समावेश करण्यात आला आहे. या महिन्याच्या अखेरीस राज्याचे या विषयीचे म्हणणे जाणून घेतले जाईल. मिळालेल्या माहितीनुसार गोवा, महाराष्ट्र व गुजरातमधील गावे आधी अधिसूचित केली जाणार आहेत. सप्टेंबरच्या मध्यावर अंतिम अधिसूचना जारी केली जाऊ शकते.

डॉ. के. कस्तुरंगन यांच्या समितीने दिलेल्या अहवालाच्या आधारे आणि समितीने सुचवलेल्या निकषांनुसार १०८ गावे जैवसंवेदनशील करता येऊ शकतात असे मसुदा अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. गोवा, महाराष्ट्र गुजरातसह कर्नाटक, केरळ व तमिळनाडूतील गावे जैवसंवेदनशील म्हणून घोषित केली जाणार आहेत.

या राज्यांचे म्हणणे ऐकून घेण्याठी केंद्रीय वन मंत्रालयातील माजी महासंचालक संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. ती समिती या महिन्याच्या अखेरीस गोवा सरकारचे यासंदर्भातील म्हणणे ऐकून घेणार आहे.

केरळ, कर्नाटक व तमिळनाडूकडून या समितीने अतिरिक्त माहिती मागवली आहे. प्रत्येक राज्याने जैवसंवेदनशील विभागातून गावे वगळण्याची मागणी केली आहे. गेली १३ वर्षे हा प्रश्न प्रलंबित राहिला आहे.

एकूण १०८ गावांचा समावेश; उत्तरेत ६४, दक्षिणेत ४४

राज्य सरकारने जैवसंवेदनशील विभागातून ४० गावे वगळण्याची मागणी केली आहे. जैवसंवेदनशील क्षेत्रात समाविष्ट केलेल्या १०८ गावांपैकी उत्तर गोव्यात ६४, तर दक्षिण गोव्यात ४४ गावे आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'पोर्तुगीज येण्यापूर्वीपासून गोमंतकीय वारी करतायेत', CM सावंतांचं वक्तव्य; भक्तांसाठी उभारणार 'गोवा विठ्ठल-रुक्मिणी भवन'

Madhya Pradesh Abortion Case: गर्भ की गर्भपात? फैसला फक्त आईचा, बापाचा नाही! 2 वर्षांच्या संसारानंतर वेगळ्या झालेल्या महिलेसाठी 'कोर्ट' बनले पाठीराखा

'रेती टंचाई', सीमाभागात भडकलं 'दरयुद्ध'; स्थानिक पुरवठा अपुरा, गोवा-सिंधुदुर्गातील बांधकाम साहित्याच्या दरवाढीचा उद्योगांवर परिणाम

Bicholim Bus Stand: डिचोली बसस्थानकाचे चालू महिन्‍यातच लोकार्पण! 4 वर्षांची प्रतीक्षा संपणार; भर पावसातही काम युद्धपातळीवर सुरू

जगायला गाव, पण सरणाला जागा नाही! पेडणे तालुक्यात सार्वजनिक स्मशानभूमींची वानवा; अनेक ठिकाणी रस्ता, वीज, पाणीही नाही

SCROLL FOR NEXT