Goa Government | Handicap Workers Dainik Gomantak
गोवा

Goa Government: 163 दिव्यांग सरकारी कर्मचारी बढतीच्या प्रतीक्षेत

Goa Government: केंद्र सरकारनेही नवा आदेश जारी केला पण गोवा सरकारने त्याचे पालन केलेच नाही.

दैनिक गोमन्तक

Goa Government: दिव्यांग असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना बढतीत राखीवता देण्यासंदर्भात सरकारने धोरण बनवण्याचा आदेश गोवा मानव हक्क आयोगाने दिला असून आयोगाने दिलेली 90 दिवसांची मुदतही संपली आहे. शेवटची मुदत 29 सप्टेंबर 2022 होती. त्याचे पालन अजून झालेले नाही. एकूण 163 दिव्यांग सरकारी कर्मचारी बढतीच्या प्रतीक्षेत आहे.

सरकारी कर्मचारी विशांत नागवेकर यांनी गोवा मानवीहक्क आयोगाकडे 31 जुलै 2021 रोजी तक्रार केली होती. दिव्यांग हक्क कायदा 2016 प्रमाणे दिव्यांगांना सरकारी नोकरीत 4 टक्के राखीवता आहे. त्या संदर्भात गोवा सरकारने 8 ऑगस्ट 2018 रोजी अध्यादेश जारी केलेला आहे,

मात्र, बढतीत राखीवता ठेवण्या संदर्भात काहीच व्यवस्था करण्यात आलेली नाही. दिव्यांगाना बढतीत राखिवता देण्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात आव्हान याचिका न्यायप्रविष्ट असून त्यामुळे सरकारने निर्णय घेतला नसल्याचे उत्तर मानव हक्क आयोगाला देण्यात आले होते.

केंद्र सरकारनेही नवा आदेश जारी केला पण गोवा सरकारने त्याचे पालन केले नाही. 20 जून 2022 रोजी आयोगाने आदेश देताना सरकारला 90 दिवसांची मुदत दिली. 29 सप्टेंबर 2022 रोजी शेवटची मुदत होती.तीही आता उलटून गेली आहे.

40 टक्यांपेक्षा जास्त अपंगत्व असलेले 163 कर्मचारी बढतीच्या प्रतीक्षेत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तक्रारदार नागवेकर यांच्या बढती संदर्भात संबंधात खात्याला या पूर्वीच सूचना जारी केल्याची माहिती त्यांना दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT