Is the Central Government dissatisfied with the work of the Goa Government?
Is the Central Government dissatisfied with the work of the Goa Government? 
गोवा

गोव्यात का रंगली नेतृत्वबदलाची चर्चा...?                    

दैनिक गोमंतक

पणजी: राज्यात नेतृत्व बदल होणार का याविषयीची चर्चा आज दिवसभर रंगली होती. गेल्या आठवड्यात भाजपच्या (BJP) गाभा समितीच्या बैठकीत काही ज्येष्ठ सदस्यांनी सरकारच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त करतानाच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांची चांगलीच कानउघाडणी केल्याची माहिती फुटली होती. त्यामुळे आज फिरत असलेला नेतृत्वबदलाचा संदेश अनेकांना खरा वाटत होता. (Is the Central Government dissatisfied with the work of the Goa Government?)

राज्यातील सरकारने (Goa Government) आपली प्रतिमा जपली नाही याविषयी केंद्रीय नेतृत्व नाराज असल्याची दबकी चर्चा आहे. मुख्यमंत्र्यांनी (Chief Minister) ज्या पद्धतीने आरोग्य खात्याचा ताबा घेतला व गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात जाऊन बैठका घेऊ लागले होते. त्यावरून ते सुरवातीला आरोग्य खाते आपल्याकडे घेतील, अशी चर्चा सुरू झाली होती. ऑक्सिजन पुरवठ्याचा विषय मुख्यमंत्र्यांनी आपल्याकडे घेतल्यानंतर, मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी ऑक्सिजन विषयाची उच्च न्यायालयाने चौकशी करावी, अशी मागणी केली होती. त्यांच्यातील वादात केंद्रीय पातळीवर हस्तक्षेप करावा लागला होता. तो वाद मिटला असे वाटत असले, तरी काहीजण ते मानण्यास तयार नाहीत. काही ज्येष्ठ नेत्यांनाही नेतृत्व बदल होऊ शकतो असे वाटते. त्याचमुळे आज दुपारी नेतृत्व बदलाविषयी माहिती समाज माध्यमांवर फिरू लागली आणि ती साऱ्यांनी खरी मानून घेतली.

भाजप हा शिस्तबद्ध पक्ष असल्याने नेतृत्व बदल करायचा झाल्यास त्याचा असा डांगोरा पिटला जाणार नाही हे ठरून गेलेले आहे. केंद्रीय निरीक्षक राज्यात येतील, पण ते नाव निश्चित करूनच येतात. त्यामुळे नावांची चर्चा अनाठायी असते. स्व. मनोहर पर्रीकर हे संरक्षणमंत्री झाल्यावर प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर  आणि स्व. पर्रीकर यांच्या निधनानंतर डॉ. प्रमोद सावंत याचे नाव असेच दिल्लीत निश्चित झाले होते.

आताही नेतृत्व बदल करावयाचा झाल्यास भाजपसमोर फार मोठे पर्याय आहेत असे नाही. काहीजणांना संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांना मुख्यमंत्रिपद देऊन राज्यात परत पाठवले जाईल असे वाटते, तर काहीजणांना आरोग्य खात्याचा अनुभव असल्याने पार्सेकर यांच्याकडे धुरा सोपवली जाईल असे वाटते. हा सारा विचार करताना कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या 10 आमदारांचा कोणी विचारच करत नाही. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: गोव्यात लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले मंत्री, पोलिसांवर राजकीय दबाव; इंडिया आघाडीचा आरोप

Ponda Murder Case: सांताक्रुज, फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

दोन महिन्यात कसे वाढवले 40 हजार फॉलोअर्स, गोव्याच्या इन्फ्लुएन्सरने शेअर केलं सिक्रेट

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

Goa's News Wrap: ताळगाव निवडणूक निकाल, फोंड्यात खून; गोव्यातील बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT