Solar Energy  Dainik Gomantak
गोवा

Solar Energy : ऊर्जा आणि अन्न सुरक्षेसाठी केंद्र सरकार कटिबद्ध : केंद्रीयमंत्री भगवंत खुबा

सौरऊर्जा पोर्टलचा पहिला वर्धापनदिन

गोमन्तक डिजिटल टीम

Solar Energy Portal First Anniversary : देशातील नागरिकांना ऊर्जा आणि अन्नसुरक्षा प्रदान करण्यात केंद्र सरकार कोणतीही कसूर न ठेवता संपूर्ण योगदान देत राहील, असे मत केंद्रीय रसायने, खते, आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री, भगवंत खुबा यांनी आज व्यक्त केले.

छतावरील सौरऊर्जेसाठीच्या राष्ट्रीय पोर्टलच्या पहिल्या वर्धापनदिन आणि अखिल भारतीय अक्षय ऊर्जा संघटनेच्या स्थापना दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्यमंत्री प्रमोद सावंत, ऊर्जामंत्री सुदिन ढवळीकर उपस्थित होते.

मंत्री खुबा म्हणाले, कॉप २०१५ परिषदेत घोषित केल्यानुसार २०२२ पर्यंत १७५ जीडब्ल्यू नवीकरणीय ऊर्जा (जीवाश्म इंधन) साध्य करण्याचे भारताचे दूरदर्शी उद्दीष्ट निर्धारित मुदतीपूर्वीच पूर्ण झाले आणि या उल्लेखनीय कामगिरीची जागतिक समुदायाने दखल घेतली आहे.

आता सीओपी २७ परिषदेत, पंतप्रधानांनी २०७० पर्यंत नेट झिरो उत्सर्जन साध्य करण्याच्या अंतिम उद्दिष्टासह २०३० पर्यंत ५०० जीडब्ल्यू नवीकरणीय ऊर्जेपर्यंत पोहोचण्याच्या भारताचे महत्त्वाकांक्षी नवीन लक्ष्य आहे.

पंतप्रधानांच्या अमेरिका आणि फ्रान्सच्या दौऱ्यांवरून भारताची महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे आणि स्वप्ने सर्व क्षेत्रांत साकार करण्यासाठीची ठाम वचनबद्धता दिसून येते, असेही ते म्हणाले.

हरित आणि स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात राज्य सरकारची कामगिरी देशात सर्वोत्कृष्ट आहे. नेट झिरोचे लक्ष्य साध्य करण्यासाठी आमचे सकारात्मक प्रयत्न असून राज्य निर्धारित वेळेअगोदर उद्दिष्ट पूर्ण करेल.

डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lashkar e Taiba Commander Encounter: पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड हाशिम मूसा एन्काउंटरमध्ये ढेर! 527 दिवसांचा थरार संपला; भारतीय सैन्याची मोठी कारवाई VIDEO

Viral Video: ट्रेन थांबली नसती तर... सेकंदाचा खेळ अन् घडला भयंकर प्रकार; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ तूफान व्हायरल

India vs Pakistan: एक-दोन नव्हे तर तब्बल 3 वेळा होऊ शकते भारत-पाकिस्तानची टक्कर! वर्ल्ड कप 2027 चं संपूर्ण गणित जाणून घ्या

Canacona Water Crisis: काणकोणमधील बंधारे अद्याप खुलेच; नद्या-नाले कोरडे, पाणीटंचाईचे संकट गडद

Municipal Election: पालिका प्रभागरचनेची घाई; सरकार-निवडणूक आयोग आमनेसामने, '24 तासांत काम कसे करणार?'

SCROLL FOR NEXT