Chhatrapati Shivaji Maharaj dainik gomantak
गोवा

म्हापशात आज छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त उत्सव

टॅक्सीस्थानकाच्या बाजूला उभारण्यात येणाऱ्या खास मंडपात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी केली जाईल.

दैनिक गोमन्तक

म्हापसा: शिवसेनेच्या म्हापसा येथील कार्यकर्त्यांतर्फे सोमवार दि. 21 मार्च रोजी सकाळी 11 वाजता येथील टॅक्सीस्थानकाच्या बाजूला उभारण्यात येणाऱ्या खास मंडपात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी केली जाईल. गेल्या सुमारे 33 वर्षांपासून या कार्यक्रमाचे आयोजन येथील एक व्यावसायिक तथा निष्ठावंत शिवसैनिक श्रीकांत सिमेपुरुषकर यांच्या प्रमुख संयोजनाखाली केले जात आहे.

प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष सुधीर कांदोळकर, शिवसेना गोवा राज्यप्रमुख जितेश कामत, माजी राज्यप्रमुख रमेश नाईक, गोमंतक मंदिर महासंघाचे अध्यक्ष चंद्रकांत ऊर्फ भाई पंडित, सामाजिक कार्यकर्ते दीपेश नाईक, संजय बर्डे, जयेश थळी व तुषार टोपले यांची उपस्थिती लाभणार आहे.

या कार्यक्रमात काही मान्यवरांचा सत्कार केला जाईल. त्‍यात शिवोली येथील डॉ. सचिन गोवेकर, म्हापसा येथील सारस्वत विद्यालय संस्थेच्या काकुलो महाविद्यालयातील अध्यापक जनार्दन ताम्हणकर, पद्मनाभ संप्रदायाचे किटला, साल्वादोर द मुन्द येथील प्रचारक सुभाष साळगावकर, खासगी बसमालक संघटनेचे अध्यक्ष सुदीप ताम्हणकर, मोपा विमानतळ संघर्ष समितीचे कार्यकर्ता नारायण गडेकर, बांबोळी येथील सामाजिक कार्यकर्ता रामा काणकोणकर व सुकूर-पर्वरी येथील नाट्यकलाकार रामा साळगावकर यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यात नाताळची जय्यत तयारी! बाजारपेठांमध्ये 'ख्रिसमस'ची धूम; 10 फुटी झाडांनी वेधलं लक्ष

Budh Chandra Yuti: 2026 च्या सुरुवातीलाच 'बुध-चंद्र' युतीचा धमाका! धनु राशीत राजकुमार आणि मनाचा कारक एकत्र; 'या' 3 राशींच्या लोकांचे पालटणार नशीब

मसाजसाठी गेली अन् नकोसा अनुभव आला, गोव्यातील स्पा सेंटरमध्ये महिला पर्यटकाचा विनयभंग; वर्का येथील प्रकाराने खळबळ

Goa Nightclub Fire: 'बर्च' दुर्घटना, पाचही संशयित 14 दिवस न्यायालयीन कोठडीत!

IND VS SA: धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका सामना रद्द, चाहत्याचं भंगलं स्वप्न; BCCIवर संताप

SCROLL FOR NEXT