Celebrated festa of Remed Saibini in vasco which tells tradition of 300 years

 

Dainik Gomantak

गोवा

300 वर्षांची परंपरा सांगणाऱ्या रेमेद सायबिणीचे फेस्त डोंगरमाथ्यावर साजरे

कासावलीच्या मुर्डी गावातील डोंगरमाथ्यावर निर्जनस्थळी अवर लेडी ऑफ रेमेडियोसचे सुंदर असे कपेल आहे. हे कपेल रेमेद सायबिणीचे स्थान म्हणून प्रसिद्ध आहे.

दैनिक गोमन्तक

तीनशे वर्षांची परंपरा सांगणाऱ्या कासावलीच्या डोंगरमाथ्यावरील रेमेद सायबिणीचे फेस्त (festa of Remed Saibini) आज गुरुवारी सरकारने (Goa Government) घालून दिलेल्या कोविड 19 मार्गदर्शक तत्वानुसार उत्साहात साजरे करण्यात आले. दरवर्षी जानेवारी महिन्याच्या 6 तारखेला हे फेस्त साजरे करण्यात येते. केवळ अर्ध्या दिवसाच्या या फेस्ताला कोविडचा (Covid-19) वाढत्या प्रादुर्भावामुळे मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत फेस्त साजरे करण्यात आले.

कासावलीच्या मुर्डी गावातील डोंगरमाथ्यावर निर्जनस्थळी अवर लेडी ऑफ रेमेडियोसचे सुंदर असे कपेल आहे. हे कपेल रेमेद सायबिणीचे स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. या फेस्ताचे मुख्य आकर्षण म्हणजे थ्री किंग्स मास्टर्स. हे मास्टर्स म्हणजे तीन किशोरवयीन मुले राजकुमारांच्या वेषात घोड्यावर स्वार होऊन प्रार्थनेला उपस्थित राहिली. हा मान फक्त कासावली, कुएली तसेच आरोसी गावातील मूल गावकार कुळातील मुलांनाच मिळतो. त्यांना 'रे" असेही म्हटले जाते. या थ्री किंग्सचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली जाते. यावेळी मात्र कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मोजक्याच भाविकांना या फेस्ताला सहभागी करून घेतले होते.त्याकामी इतर भाविकांनी सहकार्य केले.

या कपेलकडे जाण्यासाठी पक्का रस्ता आहे. परंतु हे थ्री किंग्स डोंगराच्या पारंपरिक वाटेतूनच कपेलकडे येतात. या वेगळ्या परंपरेमुळे या फेस्ताला थ्री किंग्सचे फेस्त म्हणून संबोधले जाते. या अनोख्या परंपरेविषयी अनेक आख्यायिका गावातील जाणकारांकडून ऐकायला मिळतात. काहींच्या मते हे राजकुमार देवाचे दूत असून सुख व शांतीचे प्रतीक आहेत. फेस्ताच्या या वेगळ्या परंपरेमुळे ख्रिस्ती बांधवांपर्यंत या फेस्ताची कीर्ती पोहचलेली आहे.

ख्रिश्चन बांधवांप्रमाणे येथील हिंदूंची रेमेद सायबिणीवर श्रद्धा आहे. त्यामुळे गुर्डी व आसपासच्या गावातील हिंदू भाविकही या फेस्ताला मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. फेस्ताच्या निमित्ताने प्रत्येकाच्या घरात गोडधोड पदार्थ बनविण्याची प्रथा गेल्या कित्येक वर्षांपासून चालत आलेली आहे. पहाटे पाच ते दुपारपर्यंत विशिष्ट वेळेतच हे फेस्त साजरे केले जाते. गेले नऊ दिवस नोव्हेनानिमित्त या निर्जनस्थळी जी भाविकांची वर्दळ होती ती दुपार पर्यंत संपुष्टात आली.

दरम्यान पहाटे 4 वा. पहिलीप्रार्थना सभा झाल्यानंतर दुपारी 1 वाजेपर्यंत प्रार्थना सभा चालूच होत्या.संध्याकाळच्या सत्रात चार वाजता सुरू झालेली प्रार्थना सभा 5 वा. संपली. या फेस्तासाठी मुरगाव तालुका व्यतिरिक्त गोव्यातील इतर भागातून मोठ्या संख्येने ख्रिस्ती तसेच हिंदू भाविक तसेच विदेशी नागरिकही याफेस्ताला मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.मात्र यंदा कोविड प्रणालीचे पालन करुन फेस्त साजरे केले.त्यामुळे गर्दी उसळली नाही.

पोर्तुगीज राजवटीत कासावले येथे कासावली रायाचो डोंगरावर 1722 साली रेमेत सायबीबिणीच्या कपेलाची स्थापना केली होती. तेव्हापासून येथे रेमेत सायबिणीचे फेस्त साजरे केले जाते. ख्रिस्ती बांधव येथे मोठ्या भक्तिभावाने फेस्त साजरेकरतात तसा त्यांच्या तिथे मान आहे. तसेच ज्या घरातला मुलगा किंग होतो त्याला या फेस्तात मोठा मान असतो. संध्याकाळी 5 वा. शेवटची प्रार्थना सभा संपली की या कपेलकडे कोणीच राहत नाही अशी येथील प्रथा आजपर्यंत चालू आहे. त्यानुसार फेरीवाल्यांनी फेरी आटोपती घेतली.

यावर्षी एपिफनीची मेजवानी मानक कार्यपद्धतींचे पालन करून मोजक्या लोकांमध्ये साजरी करण्यात आली. 6 जानेवारी हा विशेष दिवस आहे, जिथे जग एपिफनीची मेजवानी साजरी करते, ज्याला सामान्यतः थ्री किंग्स फेस्ट म्हणूनही ओळखले जाते. ही मेजवानी दक्षिण गोव्यातील चांदोर आणि उत्तरेकडील रेईस मॅगोस आणि कासावली या गावांमध्ये मोठ्या भक्तिभावाने आणि धार्मिक उत्साहाने साजरी केली जाते. पूर्वेकडील या ज्ञानी लोकांनी येशू ख्रिस्ताच्या जन्माची घोषणा करणाऱ्या मार्गदर्शक तत्वांचे अनुसरण केले. कासावली लोकांसाठी एक विशेष सण असल्याचे भाविक सिरील फर्नांडीस यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT