Goa Revolution Day 2024 
गोवा

Goa Revolution Day 2024: लोहिया मैदान, डॉ. मिनेझिस; गोवा क्रांती दिनानिमित्त आलेमाव यांच्या सरकारकडे दोन मागण्या

Goa Revolution Day 2024: येत्या विधानसभेच्या अधिवेशनात सरकारने विधेयक आणावे आणि सर्व ठिकाणे ऐतिहासिक महत्वाची स्थळे म्हणून अधिसूचित करावीत - आलेमाव

Pramod Yadav

Goa Revolution Day 2024

डॉ. राम मनोहर लोहिया यांनी 18 जून 1946 रोजी मडगाव येथील ऐतिहासिक लोहिया मैदानाच्या जागेवरुन गोवा क्रांती लढ्याची सुरूवात केली. डॉ. राम मनोहर लोहिया यांना गोव्यात आमंत्रित करण्यासाठी गोमंतकीय डॉ. ज्युलियांव मिनेझिस यांनी पुढाकार घेतला होता.

गोवा सरकारने गोवा क्रांतिदिनाचा अधिकृत कार्यक्रम लोहिया मैदान, मडगाव येथे आयोजित करावा आणि गोवा विद्यापीठात डॉ. ज्युलियांव मिनेझिस यांच्या नावाने अध्ययन आसन स्थापन करावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे.

आझाद मैदानावर गोवा क्रांती दिनाच्या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 18 जून 2023 रोजी ऑक्टोबर 2023 पर्यंत स्वातंत्र्य सैनिकांची सर्व मुलांना सरकारी नोकऱ्या देण्याबाबत दिलेली स्वतःची वचनबद्धता न पाळल्याबद्दल मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

गोवा सरकारने ऐतिहासिक लोहिया मैदान, पणजीचे आझाद मैदान, असोळणा आणि पत्रादेवी येथील हुतात्मा स्मारक आणि गोवा क्रांती चळवळ आणि गोवा मुक्ती आंदोलनाशी संबंधित इतर स्मारकांना "ऐतिहासिक महत्त्वाची ठिकाणे" म्हणून अधिसूचित करावी अशी सातत्याने मागणी मी मागील सहा अधिवेशनात करीत आहे.

परंतू, सरकार त्यावर कार्यवाही करण्यात अपयशी ठरले आहे. येत्या विधानसभेच्या अधिवेशनात सरकारने विधेयक आणावे आणि सर्व ठिकाणे ऐतिहासिक महत्वाची स्थळे म्हणून अधिसूचित करावीत, अशी मागणी युरी आलेमाव यांनी केली.

पर्यावरणाचा ऱ्हास, भू-रुपांतर, वाढता वेश्याव्यवसाय आणि अमली पदार्थांच्या सेवनाचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे पुढच्या पिढीला निर्माण होणाऱ्या धोक्यांचा इशारा दिल्याबद्दल गोवा स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष रोहिदास देसाई यांना मी सलाम करतो. स्वातंत्र्यसैनिकांनी पुन्हा एकदा सरकारला आरसा दाखवला आहे, असा टोला युरी आलेमाव यांनी हाणला.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी हुकूमशाही पोर्तुगीज राजवटीपासून गोवा मुक्त करण्यासाठी आपले सर्वस्व व बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आदरांजली वाहिली. आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या महान योगदानाचे स्मरण करणे हे सर्व नागरिकांचे कर्तव्य आहे, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT