CCTV In Goa  Dainik Gomantak
गोवा

पणजीत सीसीटीव्ही कॅमेरे 31 जुलैनंतर होणार कार्यरत

कायदा मोडणाऱ्यांवर नजर : नियम न पाळणाऱ्यांना दंड

दैनिक गोमन्तक

पणजी : इमेजिन स्मार्ट सिटी पणजी प्रकल्पांतर्गत बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे यावर्षी 31 जुलै नंतर कार्यरत होण्याची शक्यता आहे. पणजी शहरात विविध ठिकाणी एकूण 392 कॅमेरे बसवण्यात आले असून वाहन कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्यांना दंड ठोठवण्यासाठी याचा वापर केला जाईल. स्मार्ट सिटी, वाहतूक खाते आणि वाहतूक पोलिस विभाग समन्वय करून कारवाई करणार असल्याचे समजते.

तीन प्रकारचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यात 338 फिक्सिड बॉक्स, 44 पीटीझेड आणि 10 एफआरएस यांचा समावेश आहे. फिक्सिड बॉक्स हे न हलणारे कॅमेरा आहेत. पीटीझेड कॅमेरा हे हलणारे असून कुठल्याही दिशेने हलवता येईल, तसेच यात झूम करण्याची सुविधा आहे. एफआरएस कॅमेऱ्यामध्ये चेहरा ओळखण्याची प्रणाली आहे. तसेच कॅमेऱ्यांसोबत 10 ठिकाणी गती तपासणारे यंत्र बसवण्यात आले आहेत, अशी माहिती इमेजिन स्मार्ट सिटी पणजीचे मुख्य महाव्यवस्थापक विजय कुमार यांनी दै. ‘गोमन्तक’ला दिली. त्यांनी पुढे सांगितले की, सध्या कॅमेरे चाचणी तत्त्वांवर सुरू आहेत. 31 जुलैपर्यंत कॅमेरे सुरू करण्याची मुदत आहे, परंतु पावसाळा सुरू होत असल्याने ही मुदत वाढू शकते.

स्मार्ट सिटी प्रकल्पाचे काम जुलै 2018 साली सुरू झाले होते, परंतु, मध्यंतरी कोरोना महामारीमुळे काम वेळेत पूर्ण करता आले नाही. कॅमेरे आणि इतर गोष्टी मिळून एकूण 214 कोटी रुपये खर्च आला आहे. यात जीएसटी, चालवणे आणि देखरेख यांचा समावेश आहे. कॅमेरे पणजीतील आल्तिनो येथील एकात्मिक आदेश आणि नियंत्रण केंद्र येथून चालविले जाईल, असे कुमार यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

NRI Property Rights India: परदेशात राहणाऱ्या मुलींना भारतात वडिलांची शेतजमीन वारसाहक्काने मिळते का? वाचा काय सांगतो कायदा

GST Reforms From 1 November: 1 नोव्हेंबरपासून बदलणार GST चे नियम! नोंदणी होणार सोपी, रिफंड मिळणार फास्ट; मोदी सरकारची व्यापाऱ्यांना दिवाळी भेट

Bomb Threat News: अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा' बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी, दिलजीत दोसांझही निशाण्यावर; मुंबईच्या महापौर कार्यालयाला ईमेल मिळाल्याने खळबळ

Leopard Cat Goa: छोट्याशा तळ्याने जंगलातील दुर्मीळ पाहुण्याला आणले कॅमेऱ्यासमोर; गोव्यात बिबटमांजराचे प्रथमच चित्रीकरण

Bambolim Traffic Diversion: गोव्यातील वाहनचालकांनो, लक्ष द्या! रविवारी पहाटे 1 ते 6 बांबोळीतील वाहतूक वळविणार; पर्यायी मार्ग जाहीर

SCROLL FOR NEXT