Goa mining Dainik Gomantak
गोवा

Goa mining : पिसुर्लेतील खनिजवाहू मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे; प्रदूषण नियंत्रण मंडळ करणार देखरेख

वाहतुकीसाठी न्यायालयाने घातल्या 15 अटी

दैनिक गोमन्तक डिजिटल

पिसुर्लेतील रस्त्यांवरून वाहतूक करणाऱ्या खनिजवाहू ट्रकांवर नजर ठेवण्यासाठी गावामध्ये दोन आठवड्यांत सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत. त्यांची देखरेख प्रदूषण नियंत्रण मंडळाने करावी. वाहतुकीसाठी घातलेल्या 15 अटींचे उल्लंघन करणाऱ्या ट्रकचालकांवर कारवाई करावी, असे निर्देश देत मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने हनुमंत परब यांची जनहित याचिका निकाली काढली.

पिसुर्ले गावातून खनिजवाहू ट्रकना बंदी असूनही वाहतूक केली जात असल्याने मोठ्या प्रमाणात धूळ प्रदूषण होत आहे. या वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता असूनही त्याचा वापर केला जात नाही. या ट्रकांमुळे होणाऱ्या धूळ प्रदूषणावर नियंत्रण नाही, अशी माहिती याचिकादाराच्या वकिलांनी खंडपीठासमोर मांडली होती.

गोवा खंडपीठाने याचिकादाराने पिसुर्ले गावातून खनिजवाहू ट्रकांना निर्बंध घालण्याची केलेली विनंती मान्य केली नाही. मात्र, धूळ प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी 15 अटींचे निर्देश जारी केले आहेत.

...असे आहेत न्यायालयाचे निर्देश

  • खनिजवाहू ट्रकांनी माल रस्त्यावर पडू नये, यासाठी मागील बाजूने बोर्ड लावावेत.

  • मालावर ताडपत्री घालावी, जेणेकरून माल हवेत उडणार नाही.

  • ट्रक बंद पडल्यास त्यातील माल रस्त्याच्या बाजूला टाकू नये.

  • खाण क्षेत्रात वाहतुकीच्या रस्त्यावर पाण्याची फवारणी करावी.

  • वाहतुकीवेळी रस्त्यावर पडणारा खनिज माल त्वरित उचलावा.

  • वाहतूक कंत्राटदाराने रस्त्यांच्या तेसाठी व्यवस्था करावी.

  • रस्त्याच्या देखरेखीचा खर्च संबंधित कंत्राटदाराकडून वसूल करावा.

  • खाण खात्याने ट्रकांचा वेग ‘जीपीएस’द्वारे नियंत्रित ठेवावा.

  • गरज असेल, तेव्हा रस्त्यांचे डांबरीकरण करावे.

  • रस्ता रुंदीकरण किंवा खड्डे बुजवण्यासाठी जिल्हा खनिज निधीचा वापर करावा.

  • ट्रकांची चाके धुण्यासाठी तेथे वॉशिंग सेंटर नसल्यास ती हाताने धुवावीत.

  • धूळ प्रदूषण वाढल्यास ट्रकांच्या फेऱ्या कमी कराव्यात

  • तसेच प्रदूषण करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026 Vaping Controversy: ''चहलला जेलमध्ये टाका''! ई-सिगरेट प्रकरणावरुन माजी क्रिकेटपटू कडाडले; बीसीसीआयच्या मवाळ भूमिकेवर उपस्थित केला सवाल

अन्ननलिका जळाली, पाण्यासाठी तरसली, 8 महिने मृत्यूशी दिली झुंज! कोल्ड ड्रिंक समजून तरुणीनं प्यायलं ॲसिड; अखेर डॉक्टरांनी 'असं' वाचवलं

Ravi Yog 2026: अविवाहितांसाठी सनई-चौघड्याचे योग, स्वप्नातील गाडी आणि घराचे स्वप्न होणार पूर्ण; 'रवि योग' ठरणार वरदान

Goa Tiger Death: निसर्गाचा रक्षणकर्ताच धोक्यात! मानवाच्या क्रूरतेमुळे वाघांचा जीव टांगणीला; पूर्वजांनी पुजलेला 'व्याघ्रदेव' रक्ताळला

Fake ED Officer Scam: तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंड बलरामची पोलिसांना हुलकावणी, हायकोर्टानं फेटाळला जामीन

SCROLL FOR NEXT