Illegal Tax Collection Dainik Gomantak
गोवा

Illegal Tax Collection : पावती न देताच सोपोची वसुली करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार

आयुक्त क्लेन मेदेरा : घोटाळा किमान दहा ते पंधरा वर्षांपूर्वीचा असल्याचे दिसून येते आहे

Rajat Sawant

alleged SOPO collection scam : महानगरपालिकेच्या मार्केट परिसरात साहित्य विक्री करणाऱ्यांकडून विना पावती सोपो कर आकारणी प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीररित्या कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त क्लेन मेदेरा यांनी दिली. तसेच हा घोटाळा किमान दहा ते पंधरा वर्षांपूर्वीचा असल्याचे दिसून येते आहे असेही सांगितले.

 महानगरपालिकेच्या मार्केट इमारतीबाहेर आणि मासळी मार्केटच्या अवतीभोवती रस्त्याच्या बाजूला वस्तू विक्रीसाठी बसणाऱ्या विक्रेत्यांकडून विना पावती सोपो कर आकारल्याचा प्रकार नगरसेवक उदय मडकईकर यांनी उघडकीस आणला होता.

यानंतर या प्रकाराची दखल घेत महापालिकेने तत्काळ पावती मशीन खरेदी केली. तसेच आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी न केल्यास घडलेल्या प्रकाराविरोधात पोलिस तक्रार करणार असल्याची माहिती मडकईकर यांनी दिली होती.

दरम्यान या प्रकाराची दखल घेत आयुक्तांनी दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीररित्या कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी एका कर्मचाऱ्यास निलंबीत करण्यात आले आहे तर सुपरवायझरला कारणे दाखवा नोटस बजावण्यात आली आहे.

विना पावती सोपो कर वसुली किती वर्षांपासून सुरू आहे तसेच वसुल केलेला निधी महापालिकेच्या तिजोरीत येत होता का याची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती नेमण्यात आली असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT