Party that started at sunset ended at sunrise! Dainik Gomantak
गोवा

सूर्यास्‍ताला सुरू झालेली पार्टी सूर्योदयाला संपली!

गोव्यात पर्यटक वाढले, हॉटेल बुकिंगही जोरात, मात्र नियामवलीचे उल्लंघन

दैनिक गोमन्तक

मोरजी: मोरजी किनारी (Morjim Beach) मोठ्या संख्येने देशी पर्यटक (Tourist) येऊ लागले असून, शनिवार आणि रविवार या सुट्टीच्‍या दिवशी तर प्रचंड गर्दी झाली होती. त्यांचे मनोरंजन करण्यासाठी शनिवारी सूर्यास्तवेळी सुरू झालेली पार्टी (Night Party) दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत सुरू होती.

या संगीत रजनीतून कोरोना महामारीचे जोरदार स्वागत रिसॉर्टमालक आणि क्लबने केले आहे. शेकडो पर्यटक गर्दी करून नाचत असल्याचा व्‍हिडिओ सोशल मीडियावर व्‍हायरल झाला आहे. विशेष म्‍हणजे कोणीच मास्क घातले नव्हते. सरकारने अजून पार्ट्यांसाठी परवनगी दिलेली नाही.

कॅसिनो, बोट क्रुझ, समुद्रकिनारी तुफान गर्दी

पर्यटनासाठी कोरोनाचे निर्बंध कमी केल्यानंतर गोव्यात पर्यटकांची गर्दी वाढली आहे. गेल्या दोन दिवसांत मोठ्या प्रमाणात पर्यटक गोव्यात आले असून किनारे, कॅसिनो, बोट क्रुझ आणि पर्यटनस्थळांवर मोठी गर्दी झाली आहे. रविवारी तर अनेकांना पणजी शहरात बुकिंगसाठी हॉटेल शोधावे लागत होते. सध्या गोव्यात येणारे पर्यटक हे देशी पर्यटक आहेत. विदेशी पर्यटक गोव्यात यायला हवेत यासाठी व्हिसा खुला करण्याची मागणी ‘ट्रॅव्हल अँड टुरिझम असोसिएश’ने केली आहे.  उत्तर गोव्यातील कळंगुट, बागा, अंजुणा तर दक्षिण गोव्यातील कोलवा, बाणावली किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी वाढत आहे. पणजीजवळच्या मिरामार, दोनापावल येथे पर्यटक पर्यटनाचा आनंद घेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT