Goa Casino chef Attack Dainik Gomantak
गोवा

Goa Casino शेफच्या जीवावर बेतली मार्केटमधली बाचाबाची

बिल देण्यासाठी रांगेमध्ये राहण्यावरून झालेल्या बाचाबाचीचे रुपांतर मारहाणीत

दैनिक गोमन्तक

पणजी: जुने गोवे (Old Goa) येथील सुपरमार्केट (Super market) दुकानात सामान खरेदी करून बिल देण्यासाठी रांगेमध्ये राहण्यावरून झालेल्या बाचाबाचीचे रुपांतर मारहाणीत झाले. संशयित गजानन पवार याने केलेल्या मारहाणीत जोझेफ मान्युएल डायस हा जबर जखमी झाला होता. इस्पितळात उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले.

त्यामुळे संशयित पवार याचा जुने गोवे पोलिस शोध घेत आहेत. मात्र तो सध्या फरारी आहे. संशयित गजानन पवार याचा शोध घेण्यासाठी जुने गोवे पोलिसांनी विविध पोलिस पथके स्थापन करून त्याचा शोध सुरू केला आहे. सध्या त्याने पश्चिम बंगाल येथे पलायन केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्याच्या कुटुंबियाशी संपर्क साधून त्याला ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, जोझेफ याच्या कुटुंबियांनी त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

घरी जात असताना हल्ला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कॅसिनोमध्ये एक्सिक्युटिव्ह शेफ असलेला जोझेफ मान्युएल डायस व त्याची पत्नी जुने गोवे येथील सुपरमार्केटमध्ये सामान खरेदी करण्यास गेले होते. यावेळी त्यांची संशयित गजानन पवार याच्याबरोबर बाचाबाची झाली. सामानाचे बिल देऊन हे दाम्पत्य घरी जात असताना संशयित पवार याने जोझेफ याच्यावर सुपरमार्केटबाहेर हल्ला केला व तो तेथून पळून जात असताना इतर ग्राहकांनी त्याचा पाठलाग करून पोलिसांच्या ताब्यात दिले.

गुन्‍हा दाखल

पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा नोंदवला आहे. न्यायालयाने या हल्ल्यात जोझेफ याच्या डोक्याला जबर जखम झाल्याने त्याच्या डोक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र गोमेकॉ इस्पितळात उपचार सुरू असताना तीन आठवड्यांनी त्याचे निधन झाले. त्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी खुनाचा गुन्हा नोंदविण्‍याची मागणी पोलिसांकडे केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

SCROLL FOR NEXT