Truck Accident At Khadde Quepem Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: पाडी-केपेत काजुबिया वाहून नेणारा ट्रक दरीत कोसळला; महिला गंभीर, 13 जणांना वाचवण्यात यश

Truck Accident At Khadde Quepem Goa: सर्वांना उपचारासाठी बांबोळीच्या गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Pramod Yadav

Cashewnut Laden Truck Falls In Vally At Khadde Quepem Goa

पाडी - केपेत काजुबिया वाहून नेणारा ट्रक दरीत कोसळून भीषण अपघात झाला. यात एक महिला गंभीर जखमी झाली असून, 13 जणांना वाचवण्यात यश आले आहे. यामध्ये पाच लहान मुले, पाच पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे.

सर्वांना उपचारासाठी बांबोळीच्या गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चार लहान मुले गंभीर जखमी झाली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पाडी-केपेत काजुबिया वाहून नेणारा ट्रक दरीत कोसळला, याती 13 प्रवाशांना वचवण्यात यश आले असून, एक महिला प्रवासी गंभीर आहे. जखमी प्रवाशांमध्ये पाच लहान मुलांचा देखील समावेश आहे.

रात्रीच्या वेळेस झालेल्या अपघात ठिकाणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह समाजकल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी देखील धाव घेत बचावकार्यात मदत केली. सर्व जखमींवर बांबोळीतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, काजुबिया वाहून नेणारा ट्रक पाडी-केपेत 25 मीटर खोल नदीत कोसळला. नदीत पाणी नव्हते. मात्र, खाली उतरण्यासाठी व्यवस्थित जागा नसल्याने बचावकार्यासाठी अडथळा आला. मात्र, बचावकार्याच्या जवानांच्या मदतीने सर्वांना बाहेर काढण्यात यश आहे. सुदैवाने या अपघातात कोणीही दगावले नाही. ट्रक नेमका कोठे जात होता याबाबत माहिती मिळू शकली नाही, असे फळदेसाई म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Online Betting Raid: गोवा पोलिसांचा डबल धमाका! ऑनलाइन सट्टेबाजी आणि दलालांवर एकाच वेळी कारवाईचा बडगा

Dewald Brevis: 22 वर्षीय बेबी एबीचं वादळ, ऑस्ट्रेलियाला धुतलं, विराट कोहली- बाबर आझमचा विक्रम उद्ध्वस्त

Goa Tourism: 'अन्यथा पर्यटन सेवा बंद करू!' म्हादईवरील रिव्हर राफ्टींग निधीसाठी पंचायत आक्रमक

Cristiano Ronaldo In Goa: गोव्यात 'ख्रिस्तियानो रोनाल्डो'ला पाहण्याचे स्वप्न अधांतरी; खेळण्याबाबत अनिश्चितता कायम

Rahul Gandhi: "चोरी चोरी, चुपके चुपके..." राहुल गांधींनी केला 'वोट चोरीचा' व्हिडिओ; निवडणूक आयोगावर साधला निशाणा

SCROLL FOR NEXT