Cashew Production In Goa Dainik Gomantak
गोवा

Cashew Production In Goa: थंडीमुळे काजूला मोहोर, मात्र 'यामुळे' उत्पादनावर होऊ शकतो परिणाम

थंडी बरोबरच दव पडत असल्याने बागायतदार काहीसे चिंतीत आहेत.

Ganeshprasad Gogate

सध्या गोव्याच्या सर्वच भागात कडाक्याची थंडी पडत आहे. आंबा-काजू हंगामाच्या सुरुवातीला आवश्यक असं थंड हवामान सुरु झाल्याचे काजूला मोहोर येण्याच्या (फळधारणा होण्याच्या) दृष्टीने सुयोग्य परिस्थिती आहे. Cold Wave In Goa

मात्र थंडी बरोबरच दव पडत असल्याने बागायतदार काहीसे चिंतीत आहेत. कारण दव पडण्याचे प्रमाण आणखी काही दिवस असेच राहिल्यास आलेल्या मोहोराची पूर्णपणे वाट लागणार असून पडणाऱ्या दवामुळे मोहोर करपण्याची (जळण्याची) भीती आहे.

तापमान आतापर्यंत उत्कृष्ट असून पाऊसही पडला मात्र हवेत दव जास्त आहे, त्यामुळे मोहोर खराब होण्यासाठी आणि कीड लागण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते. "हवामानाची परिस्थिती अनुकूल नसल्यास, नवीन काजूची फुले अनेकदा सुकतात किंवा स्थानिक शेतीच्या दृष्टीने "जाळतात", एकदा कीटकांनी आक्रमण केले कि उत्पन्नात घट होते," असे कृषी संचालक, नेव्हिल अल्फोन्सो म्हणाले.

गतवर्षी प्रदीर्घ पावसामुळे काजू पिकाचे उत्पादन उत्पादनापेक्षा 40% कमी आहे. काजू हे गोव्यातील शेतकऱ्यांचे मुख्य नगदी पीक आहे आणि जर खराब हवामानाच्या परिस्थितीमुळे त्याचा फटका बसला, तर शेतकऱ्यांच्या उत्पादनावर त्याचा नक्कीच परिणाम होणार आहे. बुधवारी, सकाळी 9 वाजेपर्यंत दव पडत होते. अशी परिस्थिती असण्याचा हा सलग चौथा दिवस असून वाळपईसहीत आजूबाजूच्या इतर क्षेत्रातील शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs NZ 2nd Test: 'तो आतून खचला असेल...' सिराजला पुन्हा संघाबाहेर ठेवल्यानं दिग्गज भडकले! कैफ, मुनाफ पटेल अन् जाफर यांनी निवडकर्त्यांना घेतलं फैलावर

ST Reservation: आरक्षणाचा तिढा सोडवण्यास सरकार सरसावले; 7 डिसेंबरपासून सुनावणी, केंद्राचे प्रतिज्ञापत्र सादर

Student Visa Fraud: मुलीला कॅनडात शिकवण्याचे स्वप्न पडले महागात; व्हिसाच्या आमिषाने लाखोंचा गंडा

999cc इंजिन, 215 bhp पॉवर अन् 300 किमी प्रतितासापेक्षा जास्त वेग! BMW ची सर्वात दमदार सुपरबाईक भारतात लॉन्च; किंमत जाणून घ्या

Under 11 National Badminton: गोव्याची अमायरा धुमटकर विजेतेपदाच्या उंबरठ्यावर, 11 वर्षांखालील राष्ट्रीय बॅडमिंटनमध्ये छाप

SCROLL FOR NEXT