Cash For Job Canva
गोवा

Cash For Job घोटाळा करुन तो 'गेला', देणाऱ्यांना मात्र ‘सुतक’; मडगाव इस्‍पितळात कर्मचाऱ्याकडून सहकाऱ्यांना लाखोंचा गंडा

Margao Hospital Cash For Job: गोव्‍यात दरदिवशी ‘कॅश फॉर जॉब’ घोटाळ्याची नवनवीन प्रकरणे उघडकीस येत असतानाच आता मडगावच्‍या हॉस्‍पिसियो जिल्‍हा इस्‍पितळातही अशा प्रकारचा घोटाळा झाल्‍याचे उघड झाले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Cash for Job Scam Hits Hospicio Margao District Hospital

मडगाव: गोव्‍यात दरदिवशी ‘कॅश फॉर जॉब’ घोटाळ्याची नवनवीन प्रकरणे उघडकीस येत असतानाच आता मडगावच्‍या हॉस्‍पिसियो जिल्‍हा इस्‍पितळातही अशा प्रकारचा घोटाळा झाल्‍याचे उघड झाले आहे. या इस्‍पितळात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यानेच हा घोटाळा केल्‍याचे उघड झाले आहे.

या घोटाळ्‍याचे बळीही इस्‍पितळात काम करणारे इतर कर्मचारी ठरले आहेत. विशेष बाब म्‍हणजे ज्‍याने हा घोटाळा केला, त्‍याचे तीन दिवसांपूर्वीच निधन झाले आहे. तसेच या घोटाळ्यातून जमविलेली माया त्‍याच्‍या पत्‍नीच्‍या बँक खात्‍यात जमा झाल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे.

या दिवंगत कर्मचाऱ्याच्‍या विरोधात तक्रार देण्‍यासाठी इस्‍पितळातील काही महिला कर्मचारी आज मडगाव पोलिस स्‍थानकात आल्‍या होत्‍या. मात्र ‘तुमचा हा व्‍यवहार ज्‍या ठिकाणी झाला, तेथे जाऊन तुम्‍ही तुमच्‍या तक्रारी नोंद करा’ असे सांगत त्‍यांना माघारी पाठविण्‍यात आले. कुठलाही गुन्‍हा ‘झिरो एफआयआर’ नोंद करावा अशी सूचना गृहमंत्रालयाकडून पोलिसांना देण्‍यात आलेल्‍या आहेत. असे असताना पोलिसांनी तक्रारी का नोंद करून घेतल्‍या नाहीत?

काहींनी दागिने विकून उभा केला पैसा

या आमिषांना बळी पडणारे बहुतांश चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी आहेत. आपल्‍या मुलांना शिपायाची का होईना पण नोकरी मिळावी यासाठी त्‍यांनी येथून-तेथून पैसे जमा करून त्‍या कर्मचाऱ्याला दिले होते.

घोटाळा सुमारे एक कोटीच्‍या घरात

पीडित महिला कर्मचाऱ्यांनी दिलेल्‍या माहितीनुसार, हॉस्‍पिसियोतील किमान ३० ते ३५ कर्मचारी त्‍याच्‍या या आमिषाला बळी पडले आहेत. हा घोटाळा सुमारे ४५ लाखांहून जास्‍त आहे. शिवाय या कर्मचाऱ्याने काहींकडून उधारीवर पैसे घेतले असून ही रक्‍कम ४० ते ५० लाखांच्‍या आसपास असण्‍याची शक्‍यता आहे. मात्र अद्याप या प्रकरणी कुणावरही गुन्‍हा नोंद झालेला नाही.

संदीप परब याला १४ दिवसांची कोठडी

नोकऱ्या विक्रीप्रकरणातील माशेल येथील जलस्रोत खात्याचा अभियंता संदीप परब याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्‍यात आली आहे. म्हार्दोळ पोलिसांच्या ताब्यात असलेल्या संदीप याला आज फोंडा प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर उभे करण्‍यात आले होते. मुख्य संशयित दीपश्री सावंत गावस ही सध्या म्हार्दोळ पोलिसांच्या कोठडीत आहे.

‘क्‍लीन चीट’ नाहीच

पोलिस महासंचालकांनी ‘क्‍लीन चीट’ हा शब्‍द कुठेच वापरला नाही, असे मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज सांगितले. या प्रकरणाची चौकशी सुरू असून पोलिसांना पूर्ण स्‍वातंत्र्य दिलेले आहे. कोणाचीही गय केली जाणार नाही. तसेच कोणालाही सोडणार नाही, असेही त्‍यांनी सांगितले. दरम्‍यान, याप्रकरणी वातावरण तप्‍त बनले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT