Govind Gaude With Arrested Ex- Staff Dainik Gomantak
गोवा

Govind Gaude: मंत्री गोविंद गावडेंच्या अडचणी वाढणार? Cash For job Scam प्रकरणात कार्यालयातील माजी कर्मचाऱ्याला अटक

Cash For job Scam Goa: कॅश फॉर जॉब प्रकरणात अटकेत असणाऱ्या दीपश्री सावंत गावस हीच्यासोबत अनिकेतचे संबंध होते, अशीही माहिती आहे.

Pramod Yadav

Cash For job Scam Goa

फोंडा: गेल्या दोन आठवड्यापासून गोव्यात गाजत असलेल्या नोकरी घोटाळा प्रकरणात रोज नव्या घडामोडी घडत आहेत. पोलिसांकडून याप्रकरणी अटकसत्र सुरु असताना, या घोटाळा प्रकरणात मोठी घटना समोर आली आहे.

म्हार्दोळ पोलिसांनी कॅश फॉर जॉब स्कॅम प्रकरणी मंत्री गोविंद गावडे यांच्या कार्यालयातील माजी कर्मचाऱ्याला अटक केली असून, मंत्री गावडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

म्हार्दोळ पोलिसांनी अनिकेत कांदोळकर (माशेल) याला अटक केली आहे. अनिकेत हा क्रिडा, कला आणि सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांच्या कार्यालयातील माजी कर्मचारी असल्याची माहिती समोर आली आहे. एवढेच नव्हे तर कॅश फॉर जॉब प्रकरणात अटकेत असणाऱ्या दीपश्री सावंत गावस हीच्यासोबत अनिकेतचे संबंध होते, अशीही माहिती आहे.

लाखो रुपयांचा नोकरी घोटळा

गोव्यात सरकारी नोकरीसाठी पैसे घेऊन घोटाळा केल्याचे प्रकरण गेल्या काही दिवसांपासून गाजत आहे. याप्रकरणात दोन्ही जिल्ह्यातून आत्तापर्यंत एकूण ३३ जणांना अटक करण्यात आली आहे.

उत्तर गोवा: १७ प्रकरणांची नोंद, १३ जणांना अटक (एका शिपायाचे नाव समोर)

दक्षिण गोवा: १२ प्रकरणांची नोंद, २० जणांना अटक (सहा महिला व १४ पुरुषांचा समावेश)

मंत्री गावडेंच्या अडचणीत वाढ

कला अकादमी नूतनीकरण घोटळ्यासह विविध आरोपांमुळे कायम वादात असणारे मंत्री गावडे यांच्याशी संबधित व्यक्तीचे नाव कॅश फॉर जॉब प्रकरणात देखील समोर आले आहे.

अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याला काही दिवसांपूर्वीच गावडेंनी कामावरुन काढले होते, अशी माहिती आहे. त्यामुळे याबाबत गावडेंना देखील चौकशीला सामोरे जावे लागणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, मंत्री गावडे यांनी याबाबत अद्याप कोणतेही भाष्य केलेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT