Amit Palekar Dainik Gomantak
गोवा

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Aam Aadmi Party Criticized Sawant Government: सरकारी नोकरी विक्री घोटाळा प्रकरणातील संशयित पूजा नाईक हिच्यावर कोणाचा राजकीय वरदहस्त आहे याचे उत्तर राज्य सरकारने द्यावे.

Manish Jadhav

पणजी: सरकारी नोकरी विक्री घोटाळा प्रकरणातील संशयित पूजा नाईक हिच्यावर कोणाचा राजकीय वरदहस्त आहे याचे उत्तर राज्य सरकारने द्यावे. एकामागोमाग एक घोटाळा बाहेर येत आहे. त्यामुळे त्यात भाजप सरकार भागीदार असून सत्ताधारी सर्व मंत्री व आमदारांच्या 'कॉल रेकॉर्ड'ची तसेच या घोटाळ्याची उच्य न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी, अशी मागणी आम आदमी पक्षाच्यावतीने करण्यात आली.

मेरशी येथील चौकात आज 'आप'च्या वतीने निषेध करण्यात आला. याप्रसंगी पक्षाचे राज्य निमंत्रक अॅड, अमित पालेकर, आमदार क्रूक्ष सिल्वा यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. याप्रसंगी पालेकर म्हणाले, सहा महिन्यांपूवीं सरकारी नोकऱ्या विक्री होत असल्याचा आरोप आम्ही केला होता, तेव्हा भाजपचे प्रवक्ते त्याविषयी पुरावे मागत होते. आता नोकरी विक्री घोटाळा बाहेर आल्याने भाजप किती खोटारडेपणा करीत आहे. हे स्यार दिसून आले आहे.

नोकऱ्या विक्रीस्सठी असतात, तेव्हा घेणारेही तयार असतात आणि त्याची दलाली करणारेही असतात. याप्रकरणाची चौकशी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांसह इतर निवृत्त दोन जिल्हा न्यायाधिशांमार्फत चौकशी करावी.

त्याचबरोबर त्याची सार्वजनिकरीत्या सुनावणी व्हावी, पूजा नाईक हिला प्रथम ताब्यात घेतल्यानंतर तिला जामीन मिळाला कसा, असा सवालही त्यांनी केला. या प्रकरणात्त मंत्री आणि भाजपचे नेते या प्रकरणात सहभागी आहेत, असा आरोप करीत ते म्हणाले, या प्रकरणात कुडतरीचा भाजपचा नेता सहभागी असल्याची ध्वनिफीत आपणास मिळाली आहे, असेही आरोप त्यांनी केले.

गोमंतकीयांनी जागृत रहावे

कर्मचारी भरती आयोगामार्फत नोकरभरती केली जाणार असल्याचे राज्य सरकार सांगत आहे, पण ती काही होत नाही आणि या सरकारची लक्षणे काही ठीक दिसत नाहीत.

साध्या वेशातील पोलिस अधिकारी एका मतदारसंघात वावरतो, तो कधीच पोलिस मुख्यालयात जात नाही असे आपणास वाटत नाही त्या पोलिसाचा मोबाईल नंबर तपासायला हवा, त्याच्या सीडीआर आणि मोबाईल रेकॉर्डची तपासणी करावी. गोमंतकीयांनी आता जागे व्हावी, आम्ही करीत असलेल्या मागणीसाठी राज्यातील जनतेने पाठिंबा द्यावा आणि आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन पालेकर यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Manoj Bajpayee At IFFI: 'वेळेत पूर्णविराम आणि संवादात मौन हवे'; मनोज वाजपेयीने सांगितले अभिनेत्यांबाबतीत दोन टप्पे

Indian Navy Goa: गोव्यात नौदलाच्या जहाजाचा अपघात; मच्छिमारांच्या बोटीला धडक, दोन बेपत्ता, 11 जाणांना वाचविण्यात यश

IFFI 2024: इफ्फीच्या पहिल्या दिवशी ‘All We Imagine As Light’ ची चर्चा! छाया कदम, कानी कसूरती, दिव्या प्रभा यांचा सशक्त अभिनय

Saint Francis Xavier Exposition: जुन्या गोवेत देशी-विदेशी भाविकांची गर्दी! कार्डिनल फिलिप नेरी फेर्रांव यांनी प्रार्थना घेऊन केला शुभारंभ

Electricity Tariff Hike: वीज दरवाढीच्या शिफारशींना ‘जीसीसीआय’चा आक्षेप; पर्यटन व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होण्याची शंका

SCROLL FOR NEXT