Goa Crime News | Sexual Assault on Minor at Bhoma Dainik Gomantak
गोवा

Ponda News: शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थीनीचा विनयभंग; दोन महिन्यांनंतर गुन्हा दाखल

म्हार्दोळ पोलिसांत गुन्हा दाखल

गोमन्तक डिजिटल टीम

Molesting A Minor Student In School By Teacher: फोंडा तालुक्यातील एका हायस्कूलच्या शारीरिक विषयाच्या शिक्षकाविरोधात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हार्दोळ पोलिसांत याबाबतची तक्रार विद्यार्थीनीच्या पालकांनी दाखल केली. म्हार्दोळ पोलिस प्रकरणाचा तपास करीत आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या चौदा वर्षीय विद्यार्थिनीचा संशयित शारीरिक शिक्षकाने विनयभंग केल्यानंतर विद्यार्थिनीने ही बाब सर्वप्रथम एका शिक्षिकेला सांगितली. त्यानंतर प्रकरण मुख्याध्यापकापर्यंत गेले, पण पुढे काहीच झाले नाही.

पण ही विद्यार्थिनी आणि त्याच विद्यालयात शिकत असलेली तिची धाकटी बहीण मात्र भीतीमुळे या विद्यालयात पाय ठेवायला तयार नाही. गेल्या 1 जुलैपासून या प्रकरणाचा पाठपुरावा संबंधित विद्यार्थिनीच्या पालकांनी चालवला होता.

संबंधित शिक्षण संस्थेने याप्रकरणी कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याने अखेर म्हार्दोळ पोलिसांत या प्रकरणाची नोंद करावी लागली असे या विद्यार्थिनीच्या नातेवाईकांनी सांगितले.

पोलिस तक्रार करतेवेळी पीडित मुलीचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. म्हार्दोळ पोलिस स्थानकात या प्रकरणाची नोंद करण्यात आली असून पुढील चौकशी सुरू आहे.

12 दिवसांत तीन मुलींची पोलिसांत तक्रार

  1. नव्यानेच उद्‍घाटन झालेल्या म्हार्दोळ पोलिस स्थानकात गेल्या बारा दिवसांत एकूण तीन अल्पवयीन मुलींनी तक्रारी नोंदवल्या आहेत. दोन अल्पवयीन मुलींनी बलात्काराची तर एका अल्पवयीन मुलीने विनयभंगाची तक्रार नोंदवल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे.

  2. माशेल येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी मूळ बेळगाव येथील पण सध्या खांडोळा येथे राहणाऱ्या एका बस वाहकाला तर अन्य एका घटनेत मुस्लीमवाडा - भोम येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी मूळ उत्तर प्रदेश येथील पण सध्या भोम येथे राहणाऱ्या व स्क्रॅपयार्डमध्ये काम करणाऱ्या संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. आता हे विनयभंगाचे प्रकरण मडकईत घडले आहे.

  3. सरकार म्हणते ‘बेटी बचाव बेटी पढाव' पण इथे मात्र बेटींवरच अत्याचार होत असेल तर कायदा आणि सुव्यवस्था आहे कुठे, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT