Goa Rape Case Dainik Gomantak
गोवा

क्लबमध्ये काम करणारी महिला रस्त्यावरुन जाताना दिसली, मालकाने केला पाठलाग; पुढे जे घडलं...

गुन्हा दाखल; हणजूण पोलिस फरार संशयितांचा शोध घेत आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Crime News : नागवा-हडफडे पंचायत क्षेत्रातील एका क्लबचे मालक आणि एकाविरुध्द बलात्काराची तक्रार हणजूण पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. दरम्यान दोन्ही संशयित सध्या फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या क्लबशी संबंधित तेथील कर्मचारी महिलेकडून ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

संशयितांवर महिलेवर लैंगिक अत्याचार करुन धमकी दिल्याच्या आरोपाखाली तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 33 वर्षीय तक्रारदार महिला पूर्वी सदर क्लबमध्ये कामाला होती. हल्लीच तिने नोकरी सोडली होती. 7 रोजी बुधवारी तक्रारदार महिला रस्त्यावरून जाताना संशयितांच्या निदर्शनास आली. संशयितांनी तिचा पाठलाग केला व तिच्यावर बळजबरी केली. याबाबत कुणाकडे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

33 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार करुन तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपाखाली हणजूण पोलिसांनी क्लबचे मालक व अन्य एकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. दोघेही संशयित सध्या फरार असून हणजूण पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

Illegal Construction: बेकायदा बांधकामप्रकरणी म्हापसा पालिकेच्या तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांना अवमान नोटीस; 15 डिसेंबरला हजर राहण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT