Crime  Dainik Gomantak
गोवा

मोबाईल हॅक करून पाठवले अश्लील संदेश; विदेशात राहणाऱ्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल

पोलिस तपास सुरू आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: महिला कर्मचारीचा मोबाईल हॅक करून तिच्या खासगी माहितीचा दुरुपयोग केला, याचबरोबर फोनवर अश्लील संदेश आणि चित्रफीत पाठवल्याप्रकरणी विदेशात राहणाऱ्या मालकाविरोधात उत्तर गोव्यातील पोलिस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खासगी डिजिटल मार्केटिंग एजन्सीच्या मालकाने पीडित महिलेचा आणि तिच्या कुटुंबीयांचा मोबाईल (Mobile) हॅक करून खासगी माहितीचा दुरुपयोग केला. तिला मोबाईलवर अश्लील संदेश तसेच चित्रफीत पाठवून तिचा लैंगिक छळ केला. तक्रारीची दखल घेत पोलिसांनी (Police) विदेशात राहणाऱ्या मालकाविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 354 ए, 354 डी, 509 आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्याचे कलम 66 डी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Weather: राज्यात उष्णतेचा जोर, पावसाची प्रतीक्षा; मान्सून सक्रिय नसल्याने तापमानात सातत्याने वाढ

Goa Politics: फोंड्यात 'मगो'बाबत भाजप 'सावध'! युती कायम, अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील- रितेश नाईक

खरी कुजबुज: योग दिनावरून राजकारण करू नका!

खेळता-खेळता काळाने घातला घाला! मांगोरहिल येथे तीन वर्षीय बालकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

वर्षभरानंतर गोमंतकीयांना प्रतिदिनी हजार लीटर पाणी, 325 एमएलडी क्षमतेचे 11 जलशुद्धीकरण प्रकल्‍प

SCROLL FOR NEXT