Goa Carnival 2023 Goa Carnival 2023
गोवा

Goa Carnival 2023: पणजीत कार्निव्हलचा जोश! किंग मोमोचे थाटात आगमन...

पणजीतील मुख्य रस्त्यावर जल्लोष, गोमंतकीयांचा आनंद शिगेला...

Akshay Nirmale

Goa Carnival 2023: गोव्यात होणाऱ्या यंदाच्या कार्निव्हलसाठीच्या किंग मोमो म्हणून मडगाव येथील रुझेल डिसोझा (Russel D'Souza) यांची निवड झाली होती. पणजीत शनिवारी 18 फेब्रुवारी कार्निव्हलचे नेतृत्व किंग मोमो रुझेल डिसुजा यांनी केले.

किंग मोमो कार्निव्हलचा अधिकृत राजा असतो. नर्तक, विदूषक आणि संगीतकारांचा समावेश असलेल्या त्याच्या पथकाच्या परेडचे नेतृत्व त्यांनी केले. त्यांनीच ‘आनंदाचा हुकूम’ घोषित केला. 'खा, प्या, मजा करा' असा संदेश किंग मोमो यांनी नागरिकांना दिला.

उद्या मडगावात कार्निव्हल

यंदाच्या कार्निव्हलमध्ये प्रमुख चार ठिकाणे आहेत. 18 फेब्रुवारी रोजी पणजीत कार्निव्हल झाल्यानंतर मडगावमध्ये १९ फेब्रुवारी रोजी, वास्कोमध्ये 20 फेब्रुवारी तर म्हापसा येथे 21 फेब्रुवारी रोजी कार्निव्हल होणार आहे.

कार्निव्हल महोत्सवाची सुरूवात यंदा पहिल्यांदाच राजधानी पणजीतून न होता पर्वरीतून ‘कर्टन रेझर’ने झाली. राजधानी पणजीत दुपारी 3 नंतर पाटो येथे नव्या पुलाजवळ कार्निव्हल मिरवणुकीला सुरूवात झाली.

आदिलशहा पॅलेससमोर मंचावरून नागरिकांना या मिरवणुकीचा आनंद लुटला. कार्निव्हल मिरवणूक रस्त्यावर आकर्षक सजावट करण्यात आली आहे. विविध प्रकारच्या रंगीत पताका, आकर्षक मुखवटे , विद्युत रोषणाई आदींनी पणजी शहरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

देशी-विदेशी पर्यटक दाखल

कार्निव्हल चित्ररथ मिरवणूक पाहण्यासाठी आंतरराष्ट्रीय पर्यटक देखील हजेरी लावत असतात. कार्निव्हलनिमित्त पणजी शहरात पर्यटकांची रेलचेल असून विदेशी पर्यटकांच्या तुलनेत देशी पर्यटकांची संख्या अधिक आहे.

खा, प्या, मजा करा, असा संदेश देणाऱ्या किंग मोमोच्या राजवटीत सध्यस्थितीत सामाजिक,राजकीय संदेश देणाऱ्या अनेक चित्ररथांचा समावेश होता. कार्निव्हलच्या पार्श्‍वभूमीवर शहरात वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ISL 2026: 'एफसी गोवा'चा धडाका, दोन गोलने विजय; मुंबई सिटीची अपराजित दौड खंडित

Horoscope: मेहनतीला मिळणार यशाची सुवर्ण जोड! 'गजकेसरी' योगामुळे 5 राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे दिवस, संपत्तीत होणार अपार वाढ

GCA Premier League: 'धेंपो' गोव्यातील 'चॅम्पियन' क्रिकेट क्लब, 'चौगुले'विरुद्धच्या अंतिम लढतीत पहिल्या डावातील आघाडीवर बाजी

VIDEO: LIVE मॅचमध्ये हायव्होल्टेज ड्रामा!निमंत्रण न मिळाल्याने संतापला तरुण, थेट खेळपट्टीवरच ट्रॅक्टर फिरवला; पाहा व्हिडिओ

Margao Muncipal: नगरपालिका उद्यानात 'कॅफेटेरिया'चा प्रस्ताव मंत्री दिगंबर कामत यांनीच दिला! प्रभव नायक यांचा आरोप

SCROLL FOR NEXT