Goa Carnival  Dainik Gomantak
गोवा

म्हापशात 1 मार्च रोजी कार्निव्‍हल मिरवणूक

गोवा सरकारच्या पर्यटन खात्याने म्हापसा पालिकेच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

दैनिक गोमन्तक

म्हापसा: गोवा पर्यटन खात्याने म्हापसा पालिका मंडळाच्या सहकार्याने म्हापसा शहरात कार्निव्‍हल महोत्‍सवानिमित्त मंगळवार 1 मार्च रोजी चित्ररथ मिरवणूक आयोजित केली आहे. दुपारी 4 वाजता जुन्या आझिलो इस्पितळाजवळ या मिरवणुकीचा प्रारंभ उत्तर गोव्याचे (Goa) माजी पोलिस अधीक्षक फिंटन डिसोझा यांच्या हस्ते होईल.

ही मिरवणूक नेहमीच्या मार्गावरून मार्गक्रमण करणार आहे. या चार दिवसीय उत्सवातील कार्यक्रम शनिवार दि. 26 फेब्रुवारी ते 1 मार्यपर्यंत दररोज सायंकाळी 6 वाजता होतील. उत्सवातील अन्य सर्व कार्यक्रम श्री बोडगेश्वर मंदिर परिसरात नेहमीच्या ठिकाणी होतील. म्हापसा कार्निव्‍हल उत्सव (Carnival Festival) समितीच्या अध्यक्षपदी मुख्याधिकारी सीताराम सावळ तर सचिवपदी सुब्राय कोनेकर यांची निवड झाली आहे.

26 रोजी डिजे म्युझिक : राहुल, वेशभूषा स्पर्धा, बॅण्ड स्टील, सालसा लॅटिन डान्स ट्रूप. दि. 27 रोजी डिजे म्युझिक : सेलवीन फर्नांडिस, बँड द इंपेरीअल, लोकनृत्य तर 28 रोजी डिजे म्युझिक : राज, द वंडर ट्वॉयज्‌, बॉलिवूड डान्स ट्रप, बॅण्ड कॅसअनेस इत्यादी कार्यक्रम होतील. 1 मार्च रोजी चित्ररथ मिवरणूक झाल्यानंतर डिजे म्युझिक : अक्षय, उजो बॅण्ड, पारितोषिके जाहीर करणे, कॅन कॅन डान्स हे कार्यक्रम होणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT