Carnival Festival 2024
Carnival Festival 2024 Dainik Gomantak
गोवा

Carnival In Goa : कार्निव्हलवेळी मुलांच्या जिवाशी खेळल्याची काँग्रेसची तक्रार ; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गोमन्तक डिजिटल टीम

Carnival In Goa : मडगावात काल कार्निव्हल मिरवणूक आयोजित केली होती. त्यावेळी पडझड झालेल्या हॉस्पिसियो इमारतीच्या भिंतीवर लहान मुलांना बसायला देऊन त्यांच्या जिवाशी आयोजक खेळले आहेत, असा आरोप काँग्रेस पक्षाने केला असून त्यामुळे आयोजन समितीच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे.

लहान मुलांसह लोकांचा जीव धोक्यात आणत सरकारी अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल गोवा प्रदेश काँग्रेस समितीने आज दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली.

काँग्रेसचे सरचिटणीस मोरेन रिबेलो यांनी खजिनदार ऑरविल दौराद आणि ओलेन्सिओ सिमोयस यांच्यासह दक्षिण गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीनेत कोठवाळे यांच्याकडे तक्रार सुपूर्द केली आणि जुन्या हॉस्पिसियो हॉस्पिटलच्या बाजूला असलेल्या अर्धवट कोसळलेल्या भिंतीवर धोकादायकपणे बसलेल्या लहान मुलांसह इतर लोकांची घटना त्यांच्या निदर्शनास आणून दिली. यासंबंधीचा व्हिडिओही त्यांनी तक्रारीसोबत जोडला आहे.

मडगाव येथे काल पर्यटन खाते, मडगाव नगरपालिका आणि इतरांच्या संयुक्त विद्यमाने गोवा सरकारने आयोजित कार्निव्हल मिरवणूक पाहण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून बसलेल्यांची घटना चिंताजनक असल्याचे कॉंग्रेसने म्हटले आहे.

समाज माध्यमांवर उपलब्ध असलेल्या विविध व्हिडिओंवर लहान मुले आणि लोक जमिनीपासून सुमारे १५ ते २० फूट उंच असलेल्या भिंतीवर धोकादायकपणे बसलेले दिसतात. एवढ्या उंचीवरून पडणे जीवघेणे ठरू शकले असते, असे काँग्रेस पक्षाने आपल्या तक्रार पत्रात नमूद केले आहे.

काँग्रेस पक्षाने याआधीच आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अर्धवट कोसळलेल्या भिंतीवर लहान मुले बसलेली दिसत असलेला व्हिडिओ अपलोड केला असून दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी, पोलिस महासंचालक आणि दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक यांच्याकडून कारवाईची मागणी केली आहे, असे पत्रात पुढे म्हटले आहे.

संबंधितांवर कारवाईची मागणी

या घटनेचे गांभीर्य ओळखून आमच्या तक्रारीची तत्काळ दखल घेऊन संबंधितांविरुद्ध कारवाई करावी आणि आम्हाला १५ दिवसांच्या आत कारवाईचा अहवाल द्यावा.

असे न झाल्यास आम्हाला योग्य मंचाकडे जाण्यास भाग पडेल, असे मोरेन रिबेलो यांनी काँग्रेस पक्षाच्या वतीने सादर केलेल्या तक्रार पत्रात म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT