Carlos Ferreira Congress MLA on Goa Taxi Dainik Gomantak
गोवा

Goa Taxi : टॅक्‍सीचालकांना अडचणीत आणू नका

कार्लुस फेरेरा यांची व्‍यवसायातील गोंधळ त्‍वरित दूर करण्‍याची मागणी

दैनिक गोमन्तक

पणजी : राज्‍यातील ‘गोवा माईल्‍स’ या ॲप आधारीत टॅक्‍सी सेवबाबत अनेक तक्रारी आहेत. तरीही सरकार ओला, उबरसारख्या खासगी कंपन्‍यांना राज्‍यात परवानगी देत आहे. काही शहरे वगळता इतर ठिकाणी ओला, उबर या कंपन्‍यांचाही चांगला अनुभव नाही. त्‍यामुळे गोमंतकीय टॅक्‍सीचालक अडचणीत येतील असे कोणतेही पाऊल सरकारने उचलू नये, असे आवाहन आमदार कार्लुस फेरेरा यांनी केले. कपात सूचनांवर ते बोलत होते.

दाबोळी विमानतळावर टॅक्‍सीचालकांसाठी काऊंटर आहे. तेथून राज्‍यात कुठेही जाण्यासाठी दर निश्‍चित केलेले आहेत. किनारी भागासह राज्‍यातील इतर पर्यटनस्‍थळी असो, देशी किंवा विदेशी पर्यटक हे टॅक्‍सीचे भाडे ठरवूनच प्रवास करतात. यामुळे सरकार सक्‍ती करत असलेल्‍या डिजिटल मीटरचा काहीच उपयोग होत नाही. शिवाय निवडक शहरांतून राज्‍यात कुठेही जाण्यासाठी टॅक्‍सीचे दर निश्‍चित केलेले आहेत. सरकारने एकीकडे दर निश्‍चित केले आहेत तर दुसरीकडे डिजिटल मीटरची सक्ती केली जात आहे. हा विरोधाभास असून सरकारने याबाबतचा गोंधळ दूर करावा, असे आमदार फेरेरा म्‍हणाले.

‘ॲप’ टॅक्‍सींसाठी झोन हवेत

ॲप आधारीत सेवेसाठी राज्‍यात विभागणी (झोन) झालेली नाही. सरकारने ती करायला हवी. कारण यामुळे ॲप आधारीत सेवा अधिक चांगली चालते. देशातील अनेक शहरांत टॅक्‍सीचालकांसाठी झोन तयार केलेले आहेत. आपल्‍याकडे ते उपलब्‍धच नाहीत. अनेक विदेशी पर्यटक एका विशिष्ट टॅक्‍सीचालकाची मागणी करतात. टॅक्‍सीचालकांची विश्‍वासार्हता आणि पर्यटकांची सुरक्षाही अधिक महत्त्वाची असल्‍याचे आमदार कार्लुस फेरेरा म्‍हणाले.

ज्‍येष्ठांना बसमध्ये पूर्ण तिकीट!

ज्‍येष्ठ नागरिकांसाठी असलेली तिकिटामधील 50 टक्‍क्‍यांची सवलत अनेक खासगी बसवाले नाकारतात. सरकारने याबाबत खासगी बसचालकांना ताकीद द्यावी, अशी मागणी आमदार एल्‍टन डिकॉस्‍टा यांनी केली. तसेच कोरोना काळात बंद असलेली आगोंद ते वास्‍को बससेवा पुन्‍हा सुरू करावी. गोमंतकीय टॅक्‍सीचालकांवर अन्‍याय होणार नाही याची सरकारने दखल घ्यावी, असेही डिकॉस्‍टा म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

EPFO कडून पेन्शनधारकांसाठी मोठी खूशखबर! आता घरी बसून जमा करता येणार 'डिजिटल लाईफ सर्टिफिकेट'; जाणून घ्या पद्धत

Abhishek Sharma T20 Record: सिक्सर किंग अभिषेक शर्माची कमाल! पॉवरप्लेमध्ये 100 षटकार मारणारा ठरला जगातील पहिला फलंदाज; रोहित शर्माला सोडले मागे

Donald Trump Iran Jail: डोनाल्ड ट्रम्पला इराणनं तुरुंगात डांबलं? तेहरानमधील व्हायरल व्हिडिओनं जगात खळबळ; अमेरिकेच्या दादागिरीला चोख प्रत्युत्तर VIDEO

Codli Iron Ore Mine: कोडली खाण पुन्हा सुरू करण्यावर संमिश्र प्रतिक्रिया; रोजगाराची आशा, पण पाणी, शेती आणि प्रदूषणाची गंभीर चिंता

Made In India Smartphone Brand: ॲपल-सॅमसंगला देणार टक्कर! भारत 2028 पर्यंत लॉन्च करणार स्वतःचा स्मार्टफोन ब्रँड; केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT