Carlos Ferreira Dainik Gomantak
गोवा

Carlos Ferreira: विधानसभेतील चर्चा जनतेसाठी की टीआरपीसाठी? फेरेरांचा सवाल; दर्जा घसरला असल्याची खंत केली व्यक्त

Legislature debate: फेरेरा म्हणाले, विधानसभेत आता सत्ताधारीच जास्त बोलतात. विरोधकांना प्रश्न विचारण्याची संधी मिळू नये यासाठी असे केले जाते.

Sameer Panditrao

पणजी: विधानसभेतील चर्चेचा दर्जा घसरला आहे. ती चर्चा कोणासाठी जनतेसाठी की, टीआरपीसाठी असा प्रश्न पडावा. हळदोण्याचे आमदार कार्लुस फेरेरा यांनी हे निरीक्षण आज येथे नोंदवले.

डॉ. फ्रेडी फर्नांडिस यांच्या ‘वसाहतीनंतरचे राजकारण व सरकारे’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो होते. फेरेरा म्हणाले, विधानसभेत आता सत्ताधारीच जास्त बोलतात. विरोधकांना प्रश्न विचारण्याची संधी मिळू नये यासाठी असे केले जाते.

माध्यमांचे प्रतिनिधीही थेट प्रश्न विचारत नाहीत. पूर्वी थेट उत्तर दिले नाही, तर पुरवणी प्रश्नातून पत्रकार उत्तर मिळवत असत. लुईझिन फालेरो यांच्यासारखा एखाददुसरा थेट उत्तर न देता उत्तर देत असे. एकदा मैत्री होत नाही निदान वैर तरी निर्माण करू नका, असे त्यांनी उत्तरादाखल म्हटल्याचे स्मरते.

प्रमुख वक्ते आलेक्झांडर बार्बोझा म्हणाले, फर्नांडिस यांनी राज्याच्या ३ दशकांच्या राजकारणाचे संतुलीत विश्लेषण केले आहे. दिल्ली हायकमांडकडे प्रश्न नेण्याची पद्धत प्रतापसिंह राणे यांच्या कारकीर्दीत सुरू झाली. त्यावेळी ते दिल्लीकडे बोट दाखवून प्रश्न हाताळणे टाळत. देशात ज्यावेळी राष्ट्रीय पक्षांना इतर राज्ये साथ देत होती त्यावेळी गोव्यात प्रादेशिक पक्षाला पाठिंबा होता. इतर राज्ये प्रादेशिक पक्षांकडे वळली तेव्हा गोव्यात राष्ट्रीय पक्षाला थारा होता. त्यामुळे गोव्याचे राजकारण समजून घेणे आवश्यक आहे.

राज्य सोडणाऱ्यांची संख्या वाढतेय!

लुईझिन फालेरो म्हणाले, जनतेचा लोकशाहीवरील विश्वास दृढ करावा लागेल. आज राजकारणच कशाला समाजही बदलला आहे. आपल्या भल्यासाठी राज्य सोडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यांना राज्याच्या भल्यासाठी परत बोलवावे लागेल. त्यांना पूरक वातावरण निर्मिती करावी लागेल. एका बाजूने गोवा विकसित होत असताना गोव्याची अस्मिता टिकवून ठेवण्यासाठी लोकांना रस्त्यावर यावे लागते हा विरोधाभास आहे. तो समजून घेतला पाहिजे. या साऱ्यांना कवेत घेणारे हे पुस्तक स्थानिकांसाठीच नव्हे तर जागतिक पातळीवर संदर्भ ग्रंथ ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Live: साळगाव दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर

Goa Politics: सरकार गोवेकरांचे की दिल्लीकरांचे? आमदार वीरेश यांचा सवाल, 'सडेतोड नायक'मध्ये मांडली भूमिका

WCL 2025: टीम इंडिया 2025च्या WCL मधून बाहेर, पाकिस्तानची थेट 'फायनल'मध्ये एन्ट्री

Ro-Ro Ferry In Goa: गाजावाजा करत सुरू केलेली 'रो-रो फेरीबोट' सेवा 15 दिवसांतच ठप्प होण्याच्या मार्गावर, प्रवाशांना नाहक मन:स्ताप

Goa School: पाणी पिण्‍यासाठी विद्यार्थ्यांना मिळणार चार मिनिटांचा 'ब्रेक', शिक्षण खात्‍याकडून परिपत्रक जारी

SCROLL FOR NEXT