Carambolim Lake Dainik Gomantak
गोवा

Carambolim Lake: पाणथळ अधिसूचित होऊनही करमळी तळे अद्याप वन खात्याकडेच! शेतकऱ्यांच्या समस्या कायम

Carambolim Panchayat: तळ्यासाठी व्यवस्थापन समिती गठित करण्यास पंचायतीकडून विलंब होत असल्याचे कारण सांगितले जात आहे

गोमन्तक डिजिटल टीम

तिसवाडी: करमळी येथील तळे हे पाणथळ म्हणून अधिसूचित होऊनही त्याचा ताबा अद्याप वन खात्याकडेच आहे. अनेक वर्षांपूर्वी उच्च न्यायालयाकडून या तळ्याचा ताबा वन खात्याकडे दिला होता. या तळ्यासाठी व्यवस्थापन समिती गठित करण्यास पंचायतीकडून विलंब होत असल्याचे कारण सांगितले जात आहे.

सध्या पाणथळ म्हणून अधिसूचित केल्यानंतर पाणथळ प्राधिकरण आणि वन खात्यात समन्वयाने पुढील वाटचाल करत आहोत, अशी माहिती गोवा जैवविविधता मंडळाचे सदस्य सचिव प्रदीप सरमोकादम यांनी दै. ‘गोन्मतक’ला दिली. या तळ्यावरून सध्या गावात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून यावर तोडगा काढण्यासाठी पाणथळ प्राधिकरण आणि पंचायतीने समन्वयाने काम करण्याची मागणी शेतकरी आणि स्थानिकांनी केली आहे.

जलस्रोत खात्याकडून सौंदर्यीकरणाचे काम केले जाईल. यासंदर्भात प्राधिकरणाची मान्यता घेतली जाईल. आम्ही त्यांना काही सूचना केल्या आहेत, त्या अंतर्भूत केल्या जातील, असे सरमोकादम यांनी सांगितले.

हे तळे पाणथळ म्हणून अधिसूचित केल्यानंतर करमळी पंचायतीला तळे व्यवस्थापन समिती स्थापन करण्याची सूचना केली होती; परंतु पंचायतीकडून सहकार्य केले जात नाही. शेतकऱ्यांच्या काही समस्या असतील त्यांचे निवारण ही समिती गठित केल्यानंतर होईल. मात्र, आजपर्यंत ही समिती गठित केलेली नाही, असे सरमोकादम यांनी सांगितले.

या तळ्याच्या शेजारी शेती करणाऱ्या शेतकऱ्याचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे वृत्त दै. ‘गोन्मतक’मध्ये प्रसिद्ध झाले होते. यासंदर्भात सरमोकादम म्हणाले की, तळ्याशेजारी शेती करण्यास प्राधिकरणाकडून प्रोत्साहन दिले जात आहे. परंतु यासाठी तळे व्यवस्थापन समिती गठित करण्याची आवश्यकता आहे.

पूर्वी तळ्याचे पाणी सुकवून तेथे शेती केली जात होती. मात्र आता पाणी सुकवल्यास पक्षी येणार नाहीत, असा पक्षीप्रेमींचा दावा आहे. तसेच काही शेतकऱ्यांनी आपली जमीन विक्री करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे पाणी सुकवून शेती करणे शक्य नाही.

करमळी तळे पाणथळ म्हणून अधिसूचित केल्यानंतर तळापासून ५० मीटरचा बफर झोन लागू केला आहे. त्यामुळे हे अंतर सोडून बांधकाम करण्यास परवानगी आहे; परंतु नवीन बांधकामांना परवानगी दिली जाणार नाही. नियमांचे पालन सक्तीने केले जाईल.
प्रदीप सरमोकादम, सदस्य सचिव, गोवा जैवविविधता मंडळ
तळे व्यवस्थापन समिती महत्त्वाची असून लवकरच ती गठित करण्यासाठी प्रयत्न केले जातील. गेल्या काही ग्रामसभांमध्ये हा विषय मांडला होता; परंतु काही कारणांमुळे हा ठराव मंजूर होऊ शकला नाही. यासाठी सरपंच आणि पंचसदस्यांनी पुढाकार घेणे अपेक्षित आहे.
दिनेश उसगावकर, सदस्य, जैवविविधता व्यवस्थापन समिती, करमळी
करमळी तळे जेव्हा पाणथळ म्हणून घोषित करून अधिसूचित केले, तेव्हा लोकांच्या मनात भीती निर्माण झाली होती. त्यामुळे पाणथळ प्राधिकरणाने पंचायतीमार्फत लोकांशी संवाद साधून त्यांच्या मनातील भीती दूर करण्याची गरज आहे. तसेच तळे व्यवस्थापन समिती पंचायतीकडून लवकरच स्थापन केली जाईल.
राजेश नाईक, पंच सदस्य, करमळी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 26 August 2026: बुधवार 'या' राशींसाठी ठरणार वरदान! करिअरमध्ये मिळणार गरुडभरारीची संधी; उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होणार

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

SCROLL FOR NEXT