Carambolim lake  Dainik Gomantak
गोवा

Carambolim News : करमळी तळे सौंदर्यीकरणाचा स्थानिकांना होणार लाभ : फळदेसाई

शिरोडकर यांच्या हस्ते पायाभरणी

गोमन्तक डिजिटल टीम

Carambolim News : तिसवाडी, करमळी तळ्याच्या सौंदर्यीकरणाचा लाभ स्थानिकांना होणार असून रोजगार आणि व्यवसायाच्या संधी प्राप्त होतील. तळ्याला भेट देण्यासाठी देशी व विदेशी पर्यटक येतात, त्यासाठी सौदर्यीकरण महत्त्वाचे ठरणार आहे, असे विधान कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांनी केली.

करमळी येथे सौंदर्यीकरणाच्या कामाची पायाभरणी जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी करमळीचे सरपंच कुष्टा सालेलकर, जिल्हा पंचायत सदस्य धाकू मडकईकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

पुढील वर्षी मे महिन्यापर्यंत सौंदर्यीकरण पूर्ण होईल, यामुळे स्थानिक लोकांना रोजगार आणि व्यवसाय उपलब्ध होईल, रेल्वे स्थानक जवळच आहे.

त्यामुळे रेस्टॉरंटना फायदा होईल. स्थानिक उत्पादनांना मागणी वाढेल, बोटिंगची सुविधा केल्यावर पर्यटकांची संख्या वाढेल. टॅक्सी व्यावसायिकांना लाभ होईल, करमळीला जगात प्रसिद्धी मिळावी हे आमचे स्वप्न आहे, असे फळदेसाई यांनी सांगितले.

आम्हाला या तळ्याचे संवर्धन करायचे आहे, येथील मानशीचे बांधकाम केले जाईल. काम दर्जेदार आणि सुंदर व्हायला हवे. किमान पुढील २० वर्षे तरी ते टिकले पाहिजे. मी अधूनमधून भेट देऊन पाहणी करणार आहे, असे शिरोडकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT