Mandovi Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident Death: मांडवी पूल अपघातातील; दुचाकीस्वाराचा शोध अद्याप लागलेला नाही

Goa Accident Death: तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी : सोमवारी जामीन अर्जावर होणार सुनावणी

दैनिक गोमन्तक

पणजी येथे जुन्या मांडवी पुलावर झालेल्या अपघातप्रकरणी पणजी पोलिसांनी ओडिशा येथील कारचालक अंकित त्रिपाठी याला ताब्यात घेतल्याने त्याने न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली. त्यामुळे पणजी पोलिसांनी आज त्याला अटक करून न्यायालयात हजर केले. त्याला तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

मात्र, बुडालेल्या दुचाकीस्वाराचा शोध अद्याप लागलेला नाही. याप्रकरणी संशयिताचा मद्य प्राशनासंदर्भातील रक्त चाचणी अहवाल गोमेकॉकडून मिळालेला नाही. त्यामुळे संशयिताविरुद्ध सध्या अपघाताचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक विजय चोडणकर यांनी दिली. पोलिस उपनिरीक्षक सपना गावस या प्रकरणाचा तपास करत आहेत. जावेद मनमिळावू, कष्टाळू होता

पणजीतील जुन्या मांडवी पुलावर गुरुवारी भरवेगाने जाणाऱ्या रेंट अ कारने विरुद्ध दिशेला जात समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेने नास्नोळा-हळदोणा येथील 38 वर्षीय जावेद सडेकर हा हवेत उसळून थेट मांडवी नदीत कोसळला होता. अद्याप जावेदचा थांगपत्ता लागलेला नाही.

मात्र, जावेद हा मनमिळावू तसेच कष्टाळू तरुण होता, असे त्याचा मित्रपरिवार तसेच शेजाऱ्यांनी सांगितले. त्याच्या मृत्युनंतर अनेकांनी शोक व्यक्त केला. जावेदला तीन मुले असून जावेदचा प्रेमविवाह झाला होता. पणजीत तो कॅसिनोमध्ये कामाला जायचा, अशी माहिती उपलब्ध झाली.

चालकाबाबत संभ्रम दूर

मांडवी नदीत बुडालेला दुचाकीस्वार जावेद सडेकर याचा शोध किनारपट्टी पोलिस व तटरक्षक दलामार्फत घेतला जात आहे. भरती-ओहोटीनुसार सडेकरचा देह वाहून गेला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी कारचालक अंकित याला अजून ताब्यात ठेवले आहे.

मद्यचाचणीचा अहवाल शुक्रवारी संध्याकाळपर्यंत येण्याची शक्यता होती, पण तोसुद्धा मिळालेला नाही. कारमध्ये अंकितची पत्नीही होती. त्यामुळे ती कार चालवत होती का, असा संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, कार अंकितच चालवत होता, याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ind vs Eng 1st T20: 'वैभव'ची एन्ट्री की संजू-इशानवरच विश्वास? इंग्लंडविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग 11

Pratiyuti Yog 2026: मेहनत करुन पदरी निराशा, लव्ह लाईफमध्ये दुरावा! जुलै महिन्यात ग्रहांचा महाभयंकर खेळ; 'डबल प्रतियुति योगा'मुळे 5 राशींवर ओढवणार संकट

Fake Call Centre Bust: हणजूण येथे बनावट कॉल सेंटरवर छापेमारी, क्राईम ब्रँचकडून 15 जणांना अटक; इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त

IND vs ENG: इंग्रजांविरुद्ध भिडणार टीम इंडिया! टी-20 मध्ये भारताचा दबदबा की इंग्लंडची दादागिरी? पाहा हेड-टू-हेड रेकॉर्ड

Viral Video: धावत्या ट्रेनमध्ये महिलेचं लाजिरवाणं कृत्य; 5 तास सुरू होता प्रकार, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT