Dona Paula Car Accident Dainik Gomantak
गोवा

Dona Paula Car Accident: वाहन पार्किंगचा हलगर्जीपणा चालकाला पडला महागात! उतारावरून गाडी थेट गॅरेजमध्ये, आलिशान वाहनाला धडक

Panaji police criminal case: दोना पावला येथील एका आलिशान वस्तीत वाहन पार्क करताना झालेला हलगर्जीपणा चालक मोनिया डेरूझ याला चांगलाच महागात पडला आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: दोना पावला येथील एका आलिशान वस्तीत वाहन पार्क करताना झालेला हलगर्जीपणा चालक मोनिया डेरूझ याला चांगलाच महागात पडला आहे. उतारावर वाहन सुरक्षित न ठेवल्याने अनियंत्रित झालेली गाडी थेट गॅरेजमध्ये घुसली आणि तेथील आलिशान वाहनाला धडक दिली.

या घटनेत मानवी जीविताला गंभीर धोका निर्माण झाल्याने पणजी पोलिसांनी या प्रकरणाकडे केवळ अपघात म्हणून न पाहता संशयित महिला चालकाविरुद्ध गंभीर फौजदारी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ जुलै २०२६ रोजी सकाळी ९.४५ वाजण्याच्या सुमारास नागाळी हिल, दोनापावला येथील ‘गुड शेफर्ड रेसिडेन्स’ परिसरात हा प्रकार घडला. करंझाळे येथील डेल्फीना अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या मोनिया डेरूझ यांनी आपली गाडी एका उतारावर पार्क केली होती.

या प्रकरणात केवळ मालमत्तेचे नुकसान झाले नसून जीविताशी खेळ झाल्याचे स्पष्ट होत असल्याने पणजी पोलिसांनी यात कठोर भूमिका घेतली आहे. तक्रारदार मारिया फर्नांडिस यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयित महिला चालक मोनिया डेरूझ हिच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम १२५ आणि कलम ३२४(२) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

कार, दुचाकी, संरक्षक भिंतीचे नुकसान

वाहन पूर्णपणे नियंत्रणाबाहेर जाऊन तीव्र उतारावरून मागे सुसाट घसरत गेले आणि स्थानिक रहिवासी मारिया फर्नांडिस यांच्या खासगी गॅरेजमध्ये घुसले. या अनियंत्रित आणि जोरदार धडकेमुळे गॅरेजमधील महागडी आलिशान कार, दुचाकी आणि घराची संरक्षक भिंतीचे नुकसान झाले. गॅरेजमध्ये किंवा परिसरात त्यावेळी कोणी व्यक्ती नव्हती, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT