Car Accident Dainik Gomantak
गोवा

Sangem: कार शिकतानाच झाड कोसळून महिला ठार

धोकादायक झाडे कापण्यास प्रशासनाला अपयश आल्याचा ठपका सांगेवासीयांनी ठेवला आहे.

दैनिक गोमन्तक

Sangem: ड्रायव्हिंग स्कूलच्या चालत्या गाडीवर गुलमोहराचे जीर्ण झाड उन्मळून पडल्याने वाहन चालवण्यास शिकणारी अनिता फर्नांडिस (वय ३९ वर्षे) ही बामणसाय-सांगे येथील महिला जागीच ठार झाली, तर प्रशिक्षक चालक नासिफ शेख याच्या हाताला गंभीर दुखापत झाली.

दुर्घटनेत गाडीचा चेंदामेंदा झाला. धोकादायक झाडे कापण्यास प्रशासनाला अपयश आल्याचा ठपका सांगेवासीयांनी ठेवला आहे. काल सकाळी साडेनऊ वाजता सांगे बस स्थानकावरून अनिता फर्नांडिस ही महिला बालाजी ड्रायव्हिंग स्कूलच्या प्रशिक्षक चालकासह कार चालविण्याचे प्रशिक्षण घेत होती.

पुढे अवघ्या पाच मिनिटांत सांगे पोलिस स्थानकाजवळ पोहोचताच रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेले जीर्ण गुलमोहराचे झाड चालत्या कारवर पडले आणि अनिता जागीच चिरडली गेली.

प्रशिक्षक चालक नासिफ शेख यांचा हात मोडला. त्यांना जिल्हा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठविले आहे. मृत अनिता यांचे पती परदेशी असल्यामुळे तिचा मृतदेह शवागारात ठेवण्यात आला आहे.

या दुर्घटनेमुळे सांगे-उगे हा मुख्य रस्ता दोन तास वाहतुकीसाठी ठप्प झाला. अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी जेसीबीच्या साहाय्याने झाड हटवून वाहतूक पूर्ववत सुरू केली. या घटनेचा पंचनामा पोलिस उपनिरीक्षक स्वदेश देसाई यांनी केला.

अनेकदा वन खाते धोकादायक झाडे कापण्यासाठी नागरिकांना परवानगी देत नाही, असा आरोप गुरुनाथ नाईक यांनी केला.वास्तविक अशी परवानगी मिळाल्यास अशा दुर्घटना टाळता येणे शक्य आहे.

अनिता फर्नांडिस या महिलेचा मृत्यू सांगे मतदारसंघातील रस्त्यांलगतच्या धोकादायक झाडांकडे दुर्लक्ष झाल्याने झाला, असे नगरसेवक मेशू डिकॉस्ता यांनी म्हटले आहे. डिकॉस्ता यांनी संपूर्ण सांगे मतदारसंघाच्या मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेली धोकादायक झाडे वन खात्याने कापून टाकण्याची मागणी केली आहे.

भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी झाडांकडे दुर्लक्ष करू नये,असे सांगून दुर्लक्षामुळे आज निरपराध महिलेचा बळी गेल्याचे म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT