Goa Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: मिरामार येथे कारचा अपघात, बोरीत LPG सिलिंडर वाहतूक करणारा ट्रक उलटला

गोव्यातील अपघातांचे सत्र अद्याप सुरूच असून, वेगवेगळ्या ठिकाणावरून रविवारी दोन अपघातांच्या घटना समोर आल्या आहेत.

Pramod Yadav

Goa Accident: गोव्यातील अपघातांचे सत्र अद्याप सुरूच असून, वेगवेगळ्या ठिकाणावरून आज (रविवारी) देखील दोन अपघातांच्या घटना समोर आल्या आहेत.

शनिवारी दाबोळी येथील मुख्य सिग्नलसमोर एका सिमेंट कॉंक्रिटवाहू ट्रकने सायकलस्वाराला धडक दिल्याने, त्याचा जागीच मृत्यू झाला. तर, राजधानी पणजी येथील हिरा पेट्रोल पंपाजवळ पहाटे कारच्या धडकेत मनोज श्रीधरन हा पादचारी जागीच ठार झाला. 

दरम्यान, रविवारी मिरामार येथे कारचा अपघात, बोरीत LPG सिलिंडर वाहतूक करणारा ट्रक उलटला आहे.

मिरामार येथे वीज खांबाला धडकली कार

मिरामार बीचजवळ वीज खांबाला भरधाव कारने धडक दिली आहे. अपघातात कारच्या समोरच्या भागाचे नुकसान झाले असून, कार चालकाला किरकोळ दुखापत झालीय. कारच्या धडकेमुळे वीज खांबावरील लॅम्प देखील तुटून खाली पडला आहे. आज पहाटेच्या वेळी हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

बोरीत LPG सिलिंडर वाहतूक करणारा ट्रक उलटला

बोरी येथे LPG सिलिंडर वाहतूक करणारा ट्रक उलटला आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटला असल्याचे स्थानिकांनी सांगितले. अपघातात ट्रक चालक उपेंद्र कुमार (वय 35) जखमी झाला आहे.

शनिवारी दोन अपघातात दोघांचा मृत्यू

शनिवारी (ता.8) सायंकाळी 5.45 वाजता दाबोळी राष्ट्रीय महामार्गावरील मुख्य सिग्नलजवळ सिमेंट कॉंक्रिटवाहू ट्रकची (जीए07- एफ-7155) जोरदार धडक बसल्याने सायकलस्वार खर्क प्रसाद भरदु जैशी (वय 44वर्षे, मूळ रा. महाराष्ट्र) याचा अपघातात जागीच मृत्यू झाला.

तर, पणजीत हिट ॲण्ड रन केसमध्ये हिरा पेट्रोल पंपाजवळ काल पहाटे कारच्या धडकेत मनोज श्रीधरन हा पादचारी जागीच ठार झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Gopal Khemka Murder: बिहार हादरले, गोळ्या घालून प्रसिद्ध उद्योगपती गोपाल खेमका यांची हत्या

SCROLL FOR NEXT