Car Accident in Kucheli Mapusa Dainik Gomantak
गोवा

म्हापशाजवळ भरधाव कारचा भीषण अपघात

बेळगावच्या तीन तरुणांचा अपघातात जागीच मृत्यू, एकाला अत्यवस्थ स्थितीत गोमेकॉमध्ये केलं दाखल

दैनिक गोमन्तक

म्हापसा : कुचेली - म्हापसा येथे भरधाव कारचा भीषण अपघात झाला आहे. या कार अपघातात तिघेजण जागीच ठार झालेत तर एकाला गंभीर जखमी अवस्थेत गोमॅकोमध्ये दाखल करण्यात आलं आहे. कारमधील सर्वजण बेळगाव कर्नाटकचे असल्याची माहिती असून गोव्यात पर्यटनासाठी आल्याची प्राथमिक माहिती आहे.

कर्नाटक नोंदणीकृत स्विफ्ट कारची रविवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास झाडाला धडक बसली. यात कारमधील तिघांचा मृत्यू जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला. जखमीला उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आलं आहे. म्हापशाजवळील कुचेली येथे हा अपघात झाला आहे.

दरम्यान अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र पहाटेच्या वेळी अपघात झाल्यामुळे चालकाला डुलकी लागल्याने अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हा अपघात इतका भीषण होता की कारचा चेंदामेंदा झाला. अपघातात नायर अनगोळकर (28) रोहन गदग (26) सनी अनवेकर (31) यांचा मृत्यू झाला आहे. तर विशाल कारेकर या 27 वर्षीय तरुणाला गंभीर दुखापत झाल्याने तातडीने गोमेकॉ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT