Car Accident in Goa Dainik Gomantak
गोवा

बांबोळीत भरधाव कारची डिव्हायडरला धडक

कार डिव्हायडरला धडकल्यामुळे टायर फुटून अपघात, एक जखमी

दैनिक गोमन्तक

पणजी : पणजीजवळच असलेल्या बांबोळी येथे कारचा भीषण अपघात झाला आहे. अपघातग्रस्त कार महाराष्ट्रातील असल्याची माहिती असून हा स्वयंअपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. अपघातात एकजण जखमी झाला असून त्याला जवळच असलेल्या गोमेकॉमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

बांबोळी येथे सोमवारी दुपारी एका कारचा अपघात झाला आहे. दुभाजकाला धडकल्याने कारचा टायर फुटला. या अपघातात एकजण जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान अपघाताचं कारण अद्याप अस्पष्ट असलं तरीही चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याचं बोललं जात आहे.

गोव्यात अपघातसत्र काही केल्या थांबताना दिसत नाही. रविवारी रात्री उशिरा कुचेली म्हापसा येथे प्रवासी रिक्षाचा अपघात झाल्याची माहिती आहे. या अपघातामध्ये रिक्षा कलंडल्याने रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. कुचेली येथील पुलावर हा प्रवासी रिक्षाचा अपघात झाला आहे. गोव्यात गेल्या काही दिवसांमध्ये अपघातांचं प्रमाण वाढलं आहे. त्यातच पावसामुळे अनेक ठिकाणी अपघात होत असल्याचं दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Post Monsoon Rain Update: 107 वर्षांतील निचांकी मान्सूननंतर गोव्याला आता परतीच्या पावसाचीही हुलकावणी; मान्सूनोत्तर पाऊस 99 टक्क्यांनी घटला!

Goa Winter Tourism: गोव्यात हिवाळी पर्यटनाची दणक्यात सुरुवात! मॉस्कोहून 285 पर्यटकांसह दुसरे चार्टर विमान दाबोळीत दाखल

Andhra Pradesh Boiler Explosion: आंध्र प्रदेशातील कारखान्यात भीषण स्फोट; नावात साधर्म्य असल्याने गैरसमज, औषध कंपनीने मांडली आपली बाजू

Goa Politics: 'एक कचोरी, दोन समोसा, काँग्रेस आमदारांचा काय भरोसा?'; निवडणुकांआधी 'आप'चा काँग्रेसवर जोरदार घणाघात!

Goa Accident: गुगल मॅपची वाट, कोलवाळात घात! मद्यधुंद स्‍कॉर्पिओचालकाची स्कूटरला धडक; मुंबईतील महिला पर्यटकाचा मृत्यू, पती अन् मुलगी जखमी

SCROLL FOR NEXT