Captain Viriato Fernandes Dainik Gomantak
गोवा

Captain Viriato Fernandes: आदिवासींना न्याय द्या, लोकसभेत गोव्याच्या खासदाराचं खणखणीत भाषण

Lok Sabha Winter Session 2024: सध्या गोव्यात आदिवासी समाज राजकीय आरक्षण मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने या संदर्भातील विधेयकाचा मसुदा तयार केला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी: सध्या गोव्यात आदिवासी समाज राजकीय आरक्षण मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने या संदर्भातील विधेयकाचा मसुदा तयार केला आहे. लोकसभेत विधानसभा मतदारसंघातील अनुसूचित जमातींच्या प्रतिनिधित्वाची पुनर्रचना गोवा राज्य विधेयक २०२४ वर बोलताना खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी हे विधेयक आणखी विलंब न करता मंजूर करावे, असे आवाहन केले.

गोवा विधानसभेत अनुसूचित जमातींसाठी जागांचे आरक्षण लागू करण्यासाठीचे विधेयक लोकसभेत चर्चेसाठी सादर करण्यात आले. केंद्रीय कायदामंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी या विधेयकाचा विचार आणि मंजुरीसाठी प्रस्ताव ठेवला. दक्षिण गोव्याचे काँग्रेस खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांच्यासह देशभरातील १२ खासदारांनी चर्चेत सहभाग घेतला. आज या विधेयकावरील चर्चा पूर्ण झाली नसून ती उद्या पुढे सुरू होणार आहे.

हे आरक्षण मिळावे यासाठी आदिवासी समाजाने यापूर्वी आंदोलन केले होते. राज्य विधानसभेनेही राजकीय आरक्षणाचा ठराव संमत केला होता. त्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांच्या पुढाकारातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आदिवासी समाजाच्या नेत्यांचे शिष्टमंडळ भेटले होते. लोकसभा निवडणुकीआधी हे आरक्षण मिळावे यासाठी आदिवासी समाज प्रयत्नशील होता. मिशन पोलिटीकल रिझर्वेशन या मंचाखाली आदिवासी संघटना एकत्रही आल्या होत्या.

आदिवासींना न्याय द्या: विरियातो

या चर्चेत सहभागी होताना विरियातो म्हणाले, दोन दिवसांनी गोवा आपला ६३ वा मुक्तिदिन साजरा करीत आहे. या विधेयकाला संमती दिल्यास गोव्यातील (Goa) आदिवासी समाजाला त्यांचे कायदेशीर अधिकार मिळतील. गोव्याची परंपरा, संस्कृती टिकविण्यासाठी आदिवासी समाजाने दिलेल्या योगदानाचा त्यांनी आपल्या भाषणात खास उल्लेख केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT