Most Polluted City in Goa: गोवा हे पर्यटकांच्या आवडीचे ठिकाण. मात्र निसर्गाने समृद्ध असलेल्या आपल्या राज्यात मागील काही वर्षांपासून प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामध्ये राजधानी पणजी अव्वल स्थानी आहे. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने याबाबतचा अहवाल सादर केला आहे.
राज्यातील सहा शहरांपैकी पणजीतील हवेची गुणवत्ता सर्वाधिक प्रदूषित आहे. कुंकळ्ळी ही सर्वांत प्रदूषित औद्योगिक वसाहत आणि आमोणा हे सर्वांत प्रदूषित खाण क्षेत्र असल्याचा अहवाल राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने विधानसभेत सादर केला.
एप्रिल 2022 ते मार्च 2023 या कालावधीत गोव्यातील 19 नॅशनल एअर मॉनिटरिंग प्रोग्राम स्टेशन्समधील ॲम्बियंट एअर क्वालिटी मॉनिटरिंग डेटा वार्षिक सरासरी अहवालात नमूद केला आहे.
शॉपिंगवेळी प्लॅस्टिक पिशवीचा वापर टाळा. याऐवजी कापडी पिशवी वापरा.
पाण्याचा जपून वापर करा.
धूम्रपान टाळा.
कचरा कचरापेटीतच टाका.
प्रदूषण टाळण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा.
इंधनाची बचत करा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.