CM Pramod Sawant: Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: तर दिव्यांगांना उमेदवारी देण्याचा विचार केला जाऊ शकतो!

CM Pramod Sawant: पर्पल महोत्सवातील कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी असे प्रतिपादन केले.

दैनिक गोमन्तक

CM Pramod Sawant: दिव्यांग व्यक्तीने जर निवडणुकीसाठी पुढाकार घेतला. त्यांनी जनतेचे नेतृत्व केले, तर अशा व्यक्तीला निश्‍चितपणे उमेदवारी देण्याचा विचार केला जाऊ शकतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. ते पर्पल महोत्सवातील कार्यक्रमात माध्यमांशी बोलत होते.

यावेळी समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावस्कर व इतर उपस्थित होते. डॉ. सावंत पुढे म्हणाले, ज्याप्रमाणे आता महिलांना आरक्षण मिळाले, तसे भविष्यात दिव्यांगांना आरक्षण मिळू शकते. पहिल्यांदा पंचायत, जिल्हा, आणि नंतर विधानसभा, लोकसभेच्या अनुषंगाने टप्प्या-टप्प्याने आरक्षण मिळू शकते. पर्पल फेस्टच्या माध्यमातून दिव्यांगांच्या राजकीय सहभागाबाबत चर्चेला सुरवात झाली आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

सर्वसमावेशक भारत संकल्पनेवर भर

पंतप्रधान नरेंद्र मोदी तंदरूस्त भारत, (फीट इंडिया) कौशल्य भारत, आणि सर्वसमावेशक भारत यावर अधिक भर देत आहेत. ज्यावेळी आम्ही सर्वसमावेशकता म्हणतो, तेव्हा शारिरीक, मानसिक आणि सामाजिक समावेशताही त्यात येते, असे डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT