Goa Election Campaign Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील उमेदवार निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त!

विधानसभा निवडणुकीच्या मतदानास अवघे आठ दिवस शिल्लक असल्याने सर्वच मतदारसंघांत सभा आणि बैठकांचा धडाका सुरू झाला आहे.

दैनिक गोमन्तक

वास्को: विधानसभा निवडणुकीच्या मतदानास अवघे आठ दिवस शिल्लक राहिलेले आहेत. या पार्श्वभूमीवर बहुतांशी उमेदवारांनी घरोघरी प्रचाराच्या मोहिमेची सांगता करीत सभा आणि बैठकांच्या आयोजनावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे आज रविवारपासून सर्वच मतदारसंघांत सभा आणि बैठकांचा धडाका सुरू झाला आहे. आजचा रविवार सर्व उमेदवारांसाठी सुपर संडे ठरला. राज्यातील कोविडचा (Covid-19) वाढता प्रसार लक्षात घेऊन केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यानंतर लगेचच प्रचारासाठी मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली होती. उमेदवारांना निवडक लोकांसह घरोघरी जाऊन प्रचार करण्यास तसेच निर्धारित नागरिकांच्या उपस्थितीत छोट्या सभा, बैठका घेण्याची मोकळीक दिली होती. त्यानुसार सर्वच मतदारसंघांतील उमेदवारांनी सभा, बैठकांकडे दुर्लक्ष करीत घरोघरी जाऊन प्रचार करण्यावरच भर दिला होता.

परंतु, आता मतदानास केवळ आठ दिवस शिल्लक राहिलेले असल्याने, राष्ट्रीय पक्षांच्या दिग्गज नेत्यांनी राज्यात मुक्काम ठोकलेला असल्याने आणि निवडणूक आयोगाने निर्बंध काही प्रमाणात शिथिल केल्यामुळे सर्वच उमेदवार रविवारपासून आपापल्या मतदारसंघांत सभा, बैठकांचे आयोजन करणार आहेत. बाधितांचा दर कमी असल्याने निवडणूक आयोगाने 500 ते 1000 जणांच्या उपस्थितीत जाहीर सभा घेण्याची मुभा दिली आहे. हीच संधी साधून पुढील आठ दिवस सर्वच उमेदवार प्रचाराचा धुरळा उडवतील, असे चित्र आहे.

सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसच्या काही उमेदवारांनी सभा व बैठकांची सुरुवात केली आहे पण, आता सर्वच उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी सभा, बैठकांची तयारी सुरू केल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. कोविड प्रसारामुळे यावेळी राज्यात विधानसभा निवडणुकीचा (Goa Assembly Elections 2022) जय्यत प्रचार दिसून आला नाही. त्यामुळे मतदारांकडूनही उमेदवारांना दरवेळीप्रमाणे प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळेच मतदारांचा कल कोणाकडे झुकतोय याचा अंदाज येणे कठीण झाले आहे. तरीही प्रत्येक उमेदवार मतदारांचा आपल्यालाच प्रतिसाद असल्याचा दावा करीत असल्याचेही दिसत आहे.दरम्यान आज रविवारपासून उमेदवारांच्या प्रचाराला वेग आलेला दिसला. तसेच सभा, बैठका सुरू झाल्या असल्याने त्यातून उमेदवारांच्या दाव्यातील तथ्य जनतेसमोर उघड होत आहे.

दरम्यान आजच्या रविवारी सर्व पक्षीय तसेच अपक्ष उमेदवारांना सूपर संडे ठरला. भाजप, काँग्रेस, तृणमूल, मगोप, राष्ट्रवादी, गोवा फॉरवर्ड, शिवसेना या प्रमुख पक्षांसह अपक्षांनीही प्रचारास गती दिली आहे. आपल्या मतदार संघातील प्रत्येक प्रभाग उमेदवारांनी पिंजून काढला. चहा-पाण्याची तसेच जेवणा-खाण्याची तमा न बाळगता उमेदवारांबरोबर त्यांचे कार्यकर्ते प्रचार धुमाळीत मग्न असलेले दिसले. त्यामुळे निवडणुकीची रणधुमाळी आज खऱ्याअर्थाने पहायला मिळाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

Rashi Bhavishya 04 July 2025: प्रवासाचे योग, सामाजिक मान मिळेल; महत्वाची व्यक्ती भेटेल

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

SCROLL FOR NEXT