Goa Taxi Drivers Dainik Gomantak
गोवा

Goa Taxi Drivers: ...अन्यथा प्रवाशांना नाक्यावरच सोडणार; टॅक्सीचालक आक्रमक

Taxi Drivers Against Mopa Toll and Goa Miles App: ‘मोपा’ टोलप्रश्‍नी टॅक्सीचालक संतप्त; ‘गोवा माईल्स’ला विरोध कायम

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा: गोवा माईल्स ॲप आधारित टॅक्सीसेवा रद्द करण्यासोबतच मोपा लिंक रोडवरील टोल हटविण्यासाठी स्थानिक टॅक्सीचालकांनी आज आक्रमक भूमिका घेतली. सरकारने हा टोल ताबडतोब बंद करावा. अन्यथा आम्ही प्रवाशांना टोल नाक्यावरच उतरविणार. तेथून गेस्टना चालत कुठे जायचे तिथे जाऊ देत, असा इशारा टॅक्सीचालकांनी दिला.

बुधवारी (ता.२४) म्हापसा येथील श्री बोडगेश्वर मंदिराच्या प्रांगणात सुमारे ३०० चालकांनी एकत्र जमत सरकारच्या वाहतूक धोरणावर सडकून टीका केली. गोमंतकीयांच्या हातात असलेला एकमेव टॅक्सी व्यवसाय सरकार हिसकावून घेऊन तो बिगर गोमंतकीयांना हातात देऊ पाहते, असा आरोप टॅक्सीचालकांनी केला.

टॅक्सीचालक चेतन कामत म्हणाले की, गोवा माईल्स ही सेवा रद्द करण्यावर आम्ही ठाम आहोत. मोपा लिंक रोडवर टॅक्सी चालकांकडून टोल म्हणून ५०० रुपये शुल्क आकारले जाते. हा एक प्रकारचा भ्रष्टाचार असून जीएमआर कंपनीच्या हितासाठी सरकार स्थानिकांच्या रोजगारावर गंडातर आणू पाहते आहे.

मुख्यमंत्र्यांनी गुदिन्हो यांचे वाहतूक मंत्रिपद काढून घ्यावे. कारण त्यांना स्थानिक टॅक्सीचालकांचे प्रश्न सोडविता आलेले नाही. ते अकार्यक्षम मंत्री असून त्यांनी पुढील निवडणुकीस उभे राहू नये, अशी टीका कामत यांनी केली.

श्रीकांत गावकर म्हणाले की, टॅक्सी मीटरची पद्धत कर्नाटक व महाराष्ट्रात नाही; परंतु गोव्यात सरकारने ती आमच्यावर थोपवली.

दक्षिण गोव्यातील टॅक्सीचालक सावियो म्हणाले की, आमच्यामुळे ५०० कोटी नुकसान झाले, असा आरोप सरकार करते. मुळात आम्ही सर्व कर वेळेत भरतो. मग सरकारचे पैसे गेले कुठे? याचाच अर्थ हे पैसे सरकारी तिजोरीऐवजी कुणाच्या तरी खिशात जाताहेत. गोवा माईल्सने स्थानिकांना संपविले असून ही सेवा रद्द होत नाही, तोवर आमचा लढा सुरूच राहील.

समाज कार्यकर्त्या तारा केरकर म्हणाल्या की, सरकार टॅक्सीचालकांचे शोषण करत आहे. गोमंतकीयांच्या हाती हा एकमेव व्यवसाय उरला आहे, तोदेखील सरकार गोवेकरांच्या हातून हिसकावू पाहते.

त्यांना आमचे दु:ख कळणार नाही

वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांना एका टॅक्सीचालकाने सोशल मीडियावर धमकी दिली आहे. याविषयी चेतन कामत म्हणाले की, टॅक्सीचालकांवर होणाऱ्या अन्यायाची कळ आम्हालाच सोसावी लागते. इतरांना आमचे दुःख कळणार नाही.

मीटरच्या रूपाने भुर्दंड

टॅक्सीचालक रामा वारंग म्हणाले की, ‘गोवा माईल्स’चा काऊंटर बेकायदेशीर आहे. वाहतूक मंत्री ‘गोवा माईल्स’ची स्तुती करत असले तरी, ही सेवा पुरविणाऱ्या टॅक्सीचालकांवर अनेक गुन्हे नोंद होताहेत. गाडीला मीटर बसवून वर्षाला पाच हजार रुपये शुल्क आकारले जाते. मीटरच्या रूपाने टॅक्सीचालकांवर भुर्दंड लादलाय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Coffee Health Research: रोज कॉफी पिल्यास आयुष्य खरंच वाढतं? नव्या संशोधनातून समोर आली धक्कादायक आणि महत्त्वाची माहिती

Bandoda Jain Settlement: बांदोड्यातील प्राचीन जैन वस्ती आणि विजयनगर साम्राज्याचे सुवर्णयुग

Canacona Mega Housing Project: देळेत गृहनिर्माण प्रकल्पाला तीव्र विरोध; 15 दिवसांत निर्णय न घेतल्‍यास उपोषणाचा इशारा

Hardik Pandya New Look: हार्दिक पंड्याचा नवा अवतार चर्चेत; मुंडण करून महिका शर्मासोबत श्री वेंकटेश्वर स्वामींच्या चरणी नतमस्तक Watch Video

Santa Cruz BJP Office: बाबूश-रुडॉल्फमध्ये शब्दयुद्ध! सांताक्रुझमधील नवे कार्यालयावरून आरोप-प्रत्यारोप सुरू

SCROLL FOR NEXT