Canacona Dainik Gomantak
गोवा

Canacona News : काणकोण नगराध्यक्षपदी सारा नाईक देसाई

Canacona News : या बैठकीला फक्त सात नगरसेवक उपस्थित होते. सध्या पालिकेत फक्त चारच नगरसेवक विरोधात होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Canacona News :

काणकोण, नगराध्यक्षपदी सारा शंभा नाईक देसाई यांची अपेक्षेप्रमाणे बिनविरोध निवड झाली. काणकोण नगराध्यक्ष पदासाठी नगरसेविका सारा शंभा नाईक देसाई यांचा एकमेव अर्ज निर्वाचन अधिकारी तथा मुख्याधिकारी मंगलदास गावकर यांच्याकडे दाखल झाला होता‌.

आज (गुरुवारी) नगराध्यक्ष निवडीसाठी पालिका मंंडळाची खास बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीला फक्त सात नगरसेवक उपस्थित होते. सध्या पालिकेत फक्त चारच नगरसेवक विरोधात होते. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्या चारही नगरसेवकांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन दक्षिण गोवा मतदारसंघ उमेदवार पल्लवी धेंपे यांना आपला पाठिंबा जाहीर केला होता.

त्यामुळे सध्या तरी पालिकेत विरोधी गट राहिलेला नाही. सारा नाईक देसाई यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. बिनविरोध निवड झाल्यानंतर सर्व‌ प्रभागांतील विकासकामे करण्यास सभापती रमेश तवडकर यांच्या सहकार्याने प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT