Canacona Rain Chilly Plants Dainik Gomantak
गोवा

काणकोण परिसरातही पावसाची दमदार बॅटिंग

मिरची पिकाच्या लागवडीला लवकरच सुरुवात; रोपटी तयार

दैनिक गोमन्तक

काणकोण : काणकोणात शुक्रवारी संध्याकाळी पावसाने दमदार सलामी दिली. पाऊस असाच चालू राहिल्यास मिरची शेतीच्या लागवडीला लवकरच सुरवात होणार आहे. पावसाने मृग नक्षत्राला दडी मारल्याने खोला (काणकोण) मिरची शेतीच्या लागवडीला उशीर झाला आहे. शेतकरी माळरानावर मिरची शेतीच्या लागवडीसाठी जमिन तयार करून पावसाच्या प्रतीक्षेत होते.

गेले दोन दिवस अधूनमधून पावसाची रिपरीप चालू होती. मात्र, मिरची शेती लागवडीसाठी दमदार पावसाची गरज आहे त्याचबरोबर जास्त पाऊस झाल्यास मिरचीची रोपटी वाफ्यातच कुजून जाण्याची शक्यता असते. काही वेळेला दमदार पाऊस झाल्यानंतर शेतकरी मिरची रोपट्याची लागवड करतात. मात्र, काही वेळेस पाऊस दडी मारत असल्याने शेतकऱ्यांना मिरची रोपट्यांचे सिंचन करावे लागते. काणकोणात गावडोंगरी, खोतीगाव, श्रीस्थळ, खोला या पंचायत क्षेत्रात खोला मिरचीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.

उत्पादनावर परिणाम

मिरची पिकावर परिणाम होण्याबरोबरच मिरच्या वाळवणे शक्य झाले नाही त्याचा परिणाम मिरची उत्पादनावर झाला. यंदा खोला मिरचीचा प्रति किलो दर 1200 रूपये राहिला. मात्र, दर वाढल्याने ग्राहकांनी खोला मिरचीकडे पाठ फिरवली व म्हापसा, गुंटूर, बेडगी तसेच अन्य मिरचीला पसंती दिली. काणकोण, केपे तालुक्यातील मिरची शेतीत मिरची बरोबरच दोडकी, भेंडी, काकडी, चिबूड यांची लागवड केली जाते.

दुसरीकडे सांगे भागात संध्याकाळी मान्सूनचे जोरदार आगमन झाले आहे. शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास संततधार पावसाची सुरुवात झाली. इतके दिवस मान्सून हुलकावणी देत असल्याचे चित्र होते. पण, शुक्रवारी संध्याकाळी सुरू झालेला पाऊस मान्सूनचा असल्याचा अंदाज वयस्कर मंडळींनी व्यक्त केला आहे.

दिवसभर पडलेल्या जोरदार पावसामुळे शहरातील व ग्रामीण भागातील गटारे भरून वाहत होती. नेहमीप्रमाणे पहिल्या पावसाच्या सुरवातीलाच सांगे भागात वीज गायब होण्याचा प्रकार घडल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. पहिल्याच पावसात खंडित वीजपुरवठ्याची ही परिस्थिती तर पुढील पाच महिने कसे तोंड द्यावे, असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim: डिचोली येथील बगलमार्गावर दरडीचा धोका; कोसळण्याची भीती वाढली, रेलिंगला अडकलेली दरड वर्षभर 'जैसे थे'

Yashasvi Jaiswal Fight: LIVE सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! यशस्वी जयस्वाल श्रीलंकन गोलंदाजाच्या अंगावर गेला; डोकं आपटलं, धक्का दिला अन्... Watch Video

Sarmanas Pilgaon Road: सारमानस रस्त्यावरील धूळ-चिखलाच्या समस्येवरून प्रेमेंद्र शेट आक्रमक, खनिज वाहतूक रोखली

आरोप निश्चितीपूर्वी आरोपीची बाजू ऐकून घेणे बंधनकारक; उच्च न्‍यायालयाकडून सत्र न्यायालयाचा आदेश रद्द

Illegal Massage Parlours: मसाज पार्लरविरोधात लोबोंचे पत्र; कळंगुटमध्ये बेकायदा आस्थापने सुरू असल्याचे नमूद

SCROLL FOR NEXT