Canacona Water Shortage Dainik Gomantak
गोवा

Canacona Water Shortage: दोन जलाशय उशाला; पण कोरड घशाला ! बहुतांश काणकोणकरांची व्यथा

१४ कोटी खर्चून जलवाहिनी; नळ मात्र दहाच रहिवाशांना

दैनिक गोमन्तक

Canacona Water Shortage: काणकोणात चापोली व गावणे दोन जलाशय तसेच अर्धफोंड जलाशय असूनही काणकोण तालुक्याचा काही भाग अद्याप टॅंकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. १४ कोटी रूपये खर्चून पालिका क्षेत्रात मोठ्या व्यासाची जलवाहिनी घालण्यात आली आहे. मात्र, या जलवाहिनीतून फक्त दहा रहिवाशांना नळ जोडणी देण्यात आली आहे. हे जलपुरवठा खात्याचे अपयश, की सरकारी योजनेचा बोजवारा हे कळण्यास मार्ग नाही.

चापोली धरणाचे पाणी पोळे पर्यंत पोचविण्यात आले आहे.मात्र हा पाणी पुरवठा अपुरा व अनियमित असल्याच्या रहिवाशांच्या तक्रारी आहेत. आगोंद पंचायत क्षेत्राच्या काही भागात चापोली धरणाच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो.तर काही भागात खोला येथील एका जलाशयातून पाणी पुरवठा करण्यात येत आहे. मात्र तो अपुरा असल्याची तक्रार खोला व आगोंद पंचायत क्षेत्रातील रहिवाशांची आहे.

टॅंकरवर अवलंबित्व !

गावणे धरण जलाशयात मुबलक पाणी असूनही ‘धरण उशाला, कोरड घशाला’ अशी परिस्थिती गावडोंगरी व खोतीगाव पंचायत क्षेत्रातील रहिवांशाची झाली आहे. गावडोंगरी पंचायत क्षेत्रातील श्रीस्थळ,इंद्रावाडा,तुडल,भार्स या वाड्यांना मार्च महिन्यापासून टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो. खोतीगावातील अवे अन्य भागाना टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT