Garbage  File Photo
गोवा

Canacona Garbage Problem: कचरा समस्येसाठी काणकोण पालिका अ‍ॅक्शन मोडमध्ये; मोक्याच्या ठिकाणी बसवले 15 सीसीटीव्ही

गोव्यात कचऱ्याची समस्या अधिकच गंभीर बनली आहे.

दैनिक गोमन्तक

Garbage Problem: गोव्यात कचऱ्याची समस्या अधिकच गंभीर बनली आहे. काणकोणमध्येही या समस्येमुळे नागरिक हैराण झाले आहेत. काणकोण नगरपरिषदने उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांचा मागोवा घेण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे आणि आरोपींना त्यांच्या कृत्यांबद्दल पोलिसांकडून अटक केली जाईल, असा इशारा दिला आहे.

काणकोण नगरपालिकेत रस्त्याच्या कडेला आणि मोकळ्या जागेवर कचऱ्याचे ढीग हे आरोग्यासाठी धोकादायक आणि चिंतेचा विषय बनले आहेत, असे मत रमाकांत नाईकगावकर यांनी व्यक्त केले.

ही गोष्ट कुठेतरी थांबली पाहिजे. आम्ही मोक्याच्या ठिकाणी 15 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे आणि आम्ही एक प्रायोगिक तत्त्वावर पाटणे येथे आधीच स्थापित केला आहे. मी याद्वारे जर कोणीही उघड्यावर आणि रस्त्याच्या कडेला कचरा टाकताना आढळल्यास पोलिसांकडून त्यांना अटक केली जाईल.

“स्वच्छ भारत अंतर्गत देशातील 1,850 शहरांमधून स्वच्छतेसाठी सर्वोत्तम नगरपालिका म्हणून काणकोण नगरपालिकेची निवड करण्यात आली आहे. आपल्या नगरपालिकेतील प्रत्येक नागरिकाची आणि रहिवाशाची स्वच्छता राखण्याची जबाबदारी आहे आणि त्यांनी स्वच्छता राखण्यासाठी सहकार्य केले पाहिजे,” असे नाईकगावकर म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, "रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल आणि उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार असून पोलिस त्यांना अटक करतील."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Waste Management: कचरा व्यवस्थापनाचे नियम पाळा, अन्यथा कारवाईची शक्यता; 385 घटकांवर प्रशासनाची नजर

Morjim School Repair News: महिना उलटूनही शाळेची दुरुस्ती रखडली; अंगणवाडी स्टेजवर, बालहक्क आयोगाची नाराजी

Morjim Beach Safety: मोरजी बीचवर गुरांचे कळप, भटक्या श्वानांचा उपद्रव; पर्यटन हंगामात पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न!

Ranji Trophy: गोव्याची फलंदाजी ठरतेय डोकेदुखी; विदर्भाविरुद्ध पराभवांची मालिका खंडित करण्याचे आव्हान

Rohit Sharma Dance Video: 'ले गई, ले गई' गाण्यावर रोहित शर्मानं धरला ठेका! करिश्मा कपूरसोबतचा डान्स व्हिडीओ व्हायरल; हिटमॅन म्हणाला, 'मजा आ गया'

SCROLL FOR NEXT